कार्य,उर्जा आणि शक्ती आणि महत्त्वाचे प्रश्न
हे तिन्ही घटक आपल्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे आहेत . म्हणूनच आपण आज हे स्पष्ट करून सांगणार आहोत . यावर आधारित तुम्ही टेस्ट द्या तुमची उत्तरे तपासा आणि बघा तुम्हाला किती गुण प्राप्त होतात . अजून एक टेस्ट या लेखाच्या शेवटी दिली आहे ती हि सोडवा .
कार्य :
- बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजे बल होय .
- एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणतात..
- जर बल लावले आणि विस्थापन झाले नाही तर कार्य शून्य झाले.
- पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिमाण आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकाराइतके असते.
सूत्र : कार्य = बल × विस्थापन
कार्याचे प्रकार
- प्रकार 3 आहेत
- धन, ऋण आणि शून्य कार्य
2) ऋण कार्य : ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या या विरुद्ध असते त्या वेळेस त्या बलाने केलेले कार्य ऋण कार्य असते.
3)शून्य कार्य : ज्या वळे से बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांच्या लंबरूप असतात तेव्हा ते कार्य शून्य असते.
कार्य,उर्जा आणि शक्ती आणि महत्त्वाचे प्रश्न
कार्याचे एकक
- SI पद्धतीत
- कार्याचे एकक न्यूटन-मीटर आहे.
- यालाच ज्यूल असे म्हणतात.
- म्हणजेच कार्याचे एकक ज्युल आहे
( SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन (N) व विस्थापनाचे एकक मीटर (m) आहे.)
1 ज्यूल: 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे
बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले
कार्य 1 ज्यूल होय.
1 ज्यूल = 1 न्यूटन × 1 मीटर
CGS पद्धतीत
कार्याचे एककडाईन-सेंटिमीटर आहे.
यालाच अर्ग असे म्हणतात.
अर्ग: 1 डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे
बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले
कार्य 1 अर्ग होय.
म्हणून 1 अर्ग = 1 डाईन × 1 सेमी
ज्यूल आणि अर्ग यामधील संबंध: ज्यूल =107 अर्ग
Police bharti Imp Questions पोलीस भरती मिश्र प्रश्न संच क्लिक करा
उर्जा :
- कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा म्हणतात.
- कार्य आणि
ऊर्जेची एककेसारखीच आहेत. SI पद्धतीत एकक ज्यूल
व CGS पद्धतीतील एकक अर्ग (erg) आहे.
- ऊर्जा
विविध रूपात आढळते जसे यांत्रिक, उष्णता,
प्रकाश, ध्वनी, विद्युत,
चुंबकीय रासायनिक, अणू, सौर
उर्जा इत्यादी.
उर्जा अक्षय दिवस कधी कोणत्या दिवशी असतो ?
उर्जा ही विविध स्वरुपात आढळल्या जाते.
1) यांत्रिक उर्जा: यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात..
स्थितिज ऊर्जा व गतिज ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत.
a) स्थितिज ऊर्जा (Potential Energy):
पदार्थाच्या
विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज
ऊर्जा असे म्हणतात.
समीकरण - PE = mgh
b) गतिज ऊर्जा (Kinetic Energy):
पदार्थाच्या
गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात.
समीकरण- KE = 1/2 mv2
2) उष्णता ऊर्जा:
- सूर्यापासून मिळणारी उर्जा
- इंधनाच्या ज्वलनातून मिळणारी उर्जा
- हि उष्णता उर्जेची उदाहरणे आहेत ,
- उष्णता हे एक ऊर्जेचे रूप आहे.
- सूर्यप्रकाशात उष्णता ऊर्जा असते.
- ही कॅलरी या एककात मोजली जाते
3) प्रकाश ऊर्जा: सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात
म्हणजे प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण अन्नातील ऊर्जेत होते. या अन्नाचा वापर वनस्पती
आणि प्राणी त्यांची कामे करण्यासाठी करतात म्हणजे प्रकाश हे ऊर्जेचे रूप आहे हे
समजते.
4) ध्वनी ऊर्जा: आपण कधी मोठ्या आवाजामुळे खिडकांच्या काचांना तडे गेलेले
तुम्ही पाहिले असेल.ध्वनीमुळे काही
कार्ये होतात यावरून, ध्वनी हे ऊर्जेचे एक रूप आहे हे लक्षात
येते.
हे नक्की वाचा
ऊर्जा रूपांतरण
ऊर्जेचेएका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. उदाहरणार्थ दिवाळीतील फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जा ध्वनी, प्रकाश व उष्णता ह्या ऊर्जांमध्ये रूपांतरित होते.पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री || Police Bharti Success Formula
overhead tripod - buy now
ऊर्जा अक्षय्यतेचा नियम :
ऊर्जानिर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका
प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव
अक्षय्य राहते.
ऊर्जा स्रोत
ऊर्जा मिळण्याची साधने म्हणजे ऊर्जा स्रोत होय. ऊर्जा स्रोताचे दोन प्रकारांत वर्गीकरण करता येईल.
1) पारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा अनवीकरणीय ऊर्जा स्रोत
2) अपारंपरिक ऊर्जास्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जास्रोत
पारंपारिक ऊर्जा स्त्रोत
अपारंपरिक ऊर्जास्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जास्रोत :
या ऊर्जास्रोतांचा वापर पूर्वपरंपरेने करण्यात येत नव्हता. हे ऊर्जा
स्रोत अक्षय व अखंड आहेत व विविध स्वरूपांत ते पुन्हा वापरले जातात. संशोधन करून ह्या उर्जा स्त्रोतांचा कसा वापर करता येईल यास आठी मानव प्रयत्नशील आहे .
अपारंपरिक उर्जास्त्रोत : सौर ऊर्जा . या ऊर्जेपासून आपण सौर चूल, सौर जलतापक, सौर शुष्कक, सौरविदयुत घट इत्यादी वापर करतो .
पवन ऊर्जा , जलविद्युत ऊर्जा अणू ऊर्जा:
काही महत्त्वाची
प्रकरणे
प्रकरणे |
लिंक |
अलंकार |
|
नाम |
|
सर्वनाम |
|
अभ्यासाच्या
सोप्या पायऱ्या |
|
ह्र्दय |
|
प्राचीन
राज्ये ,राजधान्या |
|
महत्त्वाची
एकके ,राशी ,उपकरणे |
|
नदीप्रणाली |
|
रक्त आणि
रक्त गट |
|
मराठी
साहित्य प्रकार – लेखक,कवी ,टोपणनावे |
|
व्याघ्र
प्रकल्प |
|
राष्ट्रीय
उद्यान |
|
धरणे आणि
जलाशये नावे |
शक्ती
कार्य जलद
किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे ‘शक्ती’ होय.
कार्य करण्याच्या दरास ‘शक्ती’ म्हणतात.
केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे
शकते.
शक्ती (P) = कार्य/काल = w/t
शक्तीचे एकक :
- SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.
1 वॅट = 1 ज्युल/सेकंद
1 किलोवॅट = 1000 वॅट
औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse
Power या एककाचा वापर प्रचलित आहे.
1 अश्वशक्ती = 746 वॅट
- व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट/ तास हे आहे.
- 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.
- 1 Kwhr = 1 Kw × 1 hr
= 1000w
× 3600 s
= 3.6 × 106 Joules
काही महत्त्वाचे प्रश्न
1) कार्य घडून
येण्यासाठी ऊर्जा ………………….. व्हावी लागते.
1. स्थानांतरित
2. अभिसारित
3. रूपांतरित
4. नष्ट
2) ज्यूल हे एकक
……………… चे आहे.
1. बल
2. कार्य
3. शक्ती
4. ऊर्जा
.
3) शक्ती म्हणजे ……………….. होय.
1. कार्य जलद होण्याचे प्रमाण
2. कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण
3. कार्य मंद होण्याचे प्रमाण
4. वेळेचे प्रमाण
4) एखादी वस्तू उचलत
असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य ……………… बलामुळे घडून येते.
1. प्रयुक्त केलेले बल
2. गुरुत्वीय बल
3. घर्षण बल
4. प्रतिक्रिया
5) तुमच्या शरीराची
स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही
………………. असता.
1. खुर्चीवर बसलेले
2. जमिनीवर बसलेले
3. जमिनीवर झोपलेले
4. जमिनीवर उभे
6). एखादी वस्तू
जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा ……………..
1. कमी होते
2. स्थिर असते
3. वाढते
4. सुरुवातीस वाढते व नंतर कमी होते.
7) वस्तूवर घडून
येणारे कार्य …………………….. वर अवलंबून नसते.
1. विस्थापन
2. लावलेले बल
3. वस्तूचा आरंभीचा वेग
4. बल व विस्थापन यांच्या दिशेतील कोन
भारत दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी अक्षय्य ऊर्जा दिवस साजरा करतो. हा दिवस उर्जेच्या नूतनीकरणक्षम संसाधनांच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करतो आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
- उत्तर : 1 आणि 3 दोन्ही
- उत्तर : 2 आणि 4 दोन्ही
- उत्तर : : 1 आणि 3 दोन्ही
- उत्तर : 2 आणि 3
- उत्तर : 3
- उत्तर : 2
- उत्तर : 3
पोलीस भरतीसाठी उपयुक्त पुस्तके - खरेदीसाठी येथे क्लिक करा
पोलीस भरती ठोकळा - https://amzn.to/3Asghco
प्रश्नसंच - https://amzn.to/4hDbTYQ
सामान्य अध्ययन - https://amzn.to/3YA5hBS
0 Comments