Total Pageviews

अलंकार - marathi vyakaran alankar

    अलंकार - marathi vyakaran alankar 

    मराठी व्याकरणातील अतिशय महत्वाचा धडा म्हणजे अलंकार . स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना थोडा अवघड वाटणारा हा धडा .अवघड वाटण्याची काही कारणे.
1) मराठी साहित्यक भाषा अवगत नसणे 
2) मराठी कविता याचं वाचन नसणे 
3) मराठी अपुऱ्या मराठी शब्दांचे  ज्ञान 
 हि काही करणे सांगता येतील . परंतु काही ठरविक उदहारणेच परीक्षेत विचारली जातात . आपण ह्या  लेखात संपूर्ण अलंकार पाहणार आहोत . तुमच्या अभ्यासला एक वेगळ वळण नवी दिशा देणारे ठरेल . 
    अलंकर अभ्यासण्पुयार्वी खाली दिलेली टेस्ट सोडवा .

    अलंकार - marathi vyakaran alankar
    अलंकार - marathi vyakaran alankar 


    अलंकार टेस्ट सोडवा


    अलंकार

    Ø  अलंकार म्हणजे दागिना .

    Ø  ज्याप्रकारे मनुष्याला सुंदर देखणे दिसण्यासाठी दागिन्याची किंवा चांगल्या कपड्यांची गरज असते त्याप्रमाणे भाषेला सुद्धा शोभा आणण्यासाठी आपण भाषेचे जे काही गुणधर्म वापरतो त्यास 'अलंकार' असे म्हणतात. 

    Ø  भाषेचे सौदर्य वाढविण्यासाठी शाब्दिक विशिष्ट रचना किवा तंत्र वापरतो त्याला भाषेचे अलंकार असे म्हणतात .

    भाषेला शोभा आणण्यासाठी आपण जे काही भाषेचे गुणधर्म वापरतो त्या गुणधर्मामुळे अलंकाराचे २ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे

    १. शब्दालंकार   २. अर्थालंकार

    १. शब्दालंकार

    Ø  ज्या विशिष्ट शब्दरचनेमुळे गद्याला किंवा पद्या‌‌ला सौंदर्य प्राप्त  होते  त्यास 'शब्दालंकार' असे म्हणतात.

    Ø  शाब्दिक चमत्कृती साधली जाते .

    शब्दालंकारचे आणखी ३ उपप्रकार पंडतात ते पुढीलप्रमाणे

    अ) अनुप्रास अलंकार

    जेंव्हा गद्यामध्ये किवा पद्यामध्ये एकाच शब्दाची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती करून वाक्याला सौंदर्य प्राप्त होते त्यास 'अनुप्रास अलंकार' असे म्हणतात.

    उदा      

    1)  पेटविले पाषाण शिवबांनी ठाराती

    2)  कड्यावरुनी या उड्या प्रथम हकुनी त्या गड्या

    3)  आज गोकुळात  रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझा घरी

    4)  बालिश हु बायकांत डबडला .

    5)  गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
    शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले(नि)

    6)    रजनीत स्थिर प सली
    हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.(ल
    )

     read more  IMP : आपल्या अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवावी 

    ब) यमक अलंकार :

    कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे दुसऱ्या चरणात पुन्हा त्याच क्रमाने परंतू भिन्न अर्थाने आल्यास त्यास 'यमक अलंकार' म्हणतात

    उदा  1) जाणावतो तो ज्ञानी  पूर्ण समाधानी  नि:सन्देह मनी सर्वकाळ ||

    2‌) सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा घडो विषम सर्वता नावडोपोटापुरता पसा

    3) पाहिजे नको पिकाया पोळी
       देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

    क) श्लेष अलंकार:

    एका वाक्यात किंवा चरणात एकच शब्द दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमककृती साधल्या जाते तेव्हा 'श्लेष अलंकार' होतो.

    1)  हे मेघा तु सर्वांना जीवन देतोस.   ( आयुष्य / पाणी )

    2)  मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. ( सूर्य – सवंगडी ,सोबती )

    3)  शंकरास पूजिले सु-मानाने  ( फुल / चांगले मन )

    4)  मला गाडी लागते . ( गरज असणे  / उलटी होणे )

    5)  रामारावना सुपारी लागते . . ( गरज असणे  / उलटी होणे )

    6)  श्रीकृष्ण नवरा मी नवरी | शिशुपाल नवरा मी न- वरी

    7)    सूर्य उगवला झाडीत...
    झाडूवाली रस्ता झाडीत...
    शिपाई गोळ्या झाडीत...
    अन् वाघहि तंगड्या झाडीत...

    अलंकार - marathi vyakaran alankar
    अलंकार - marathi vyakaran alankar


    २. अर्थालंकार

    Ø  ज्या विशिष्ट शब्द रचनेमुळे वाक्याला  अर्थ प्राप्त होतो किंवा वाक्याला  शोभा येते त्या गुणधर्माला 'अर्थालंकार' असे म्हणतात.

    Ø  अर्थामुळे भाषेला सौदर्य प्राप्त होते .

    अर्थालांकारातील काही महत्वाच्या संकल्पना

    (अ) उपमान - ज्याच्याशी कवी एखाद्या गोष्टीची तुलना करतो ती गोष्ट.

    (ब) उपमेय - ज्याची कवी तुलना करतो तो

    (क) साधर्म्य - दोन गोष्टीतील सारखेपणा

    (ड) साम्यवाचक शब्द - दोन गोष्टीतील सारखेपणा दाखविणारा शब्द

    उदा  तिचे मुख चंद्रासारखे होते.

            मुख - उपमेय

            चंद्रा - उपमान

            सारखे - साम्यवाचक शब्द 

     

    पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री  || Police Bharti Success  Formula 

    1) उपमा अलंकार

    Ø  गोष्टीची एकमेकांसोबत तुलना करून त्या दोन गोष्टीत साम्य पहिले जाते, दर्शविले जाते त्यास 'उपमा अलंकारअसे म्हणतो.

    Ø  उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखविण्यासाठी सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान, सारखे, प्रमाणे, समतुल्य, गत, जेवी यांसारखी साम्यवाचक शब्द वापरले जातात.

    उदा. 

    1)  आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूदे. 

    2)  कविताचे डोळे हरणासारखे सुंदर आहेत.

    3)  सवालच रंग तुझा पावसाळी नभापरी

    4)  तुझे अक्षर मोत्यासारखे आहे

    2) उत्प्रेक्षा अलंकार

    Ø  वाक्यातील उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना जेव्हा वाक्यात होते तेव्हा त्या अलंकारास 'उत्प्रेक्षा अलंकार' असे म्हणतात.

    Ø  जणू, गमे , भासे, वाटे , जणुकाय,की या सारखे शब्द ह्या अलंकारात वापरलेले असतात .

    उदा.

    1)  तिचे मुख जणू चंद्रच |

    2)  त्याचे अक्षर जणू मोतीच.

    3)  अर्धपायी पांढरेशी विजार गम, विहगांतील बडा फौजदार.

     मराठी प्रश्नसंच https://amzn.to/49a5pMJ

    3) रूपक अलंकार 

    जिथे उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे ते वेगवेगळे नाही असे वर्णन जिथे केलेले असते तेव्हा त्याला आपण 'रूपक अलंकारअसे म्हणतो.

    उदा. .

    1)  लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते.

    2)  देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर

    3)  कुठे बुडाला तो सोन्याचा गोळा

    4)  उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा | दावि मुखचंद्रमा सकाळीकांशी

    5)    बाई काय सांगो ,स्वामीची ती दृष्टी | अमृताची वृष्टी मज होय

    6)    नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी

     

    अलंकार - marathi vyakaran alankar
    अलंकार - marathi vyakaran alankar

    4) अतिशयोक्ती

    अलंकारात एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून बढवून चढवून किंवा ते व्याक्य फुगवून सांगितली जाते त्यास आपण 'अतिशयोक्ती अलंकार' असे म्हणतो.

    1)  अरे राहुल तुला शोधायला सारा गांव पालथा घातला.

    2)  एक तीळ होता सात झणांनी खाल्ला.

    3)  ती रडली समुद्राच्या समुद्र

    4)    जो अंबरी उफळता खुर लागलाहे | तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे

    5)    काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर

    6)    दमडीच तेल आणलं, सासूबाईच न्हान झालं |

    मामंजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली |

    उरल तेल झाकून ठेवल , लांडोरीचा पाय लागला |

    वेशीपर्यंत ओघळ गेला, त्याय्त उंट पोहून गेला .|

     

    5)स्वभावोक्ती अलंकार

    एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, स्थळाचे किंवा कुठल्याही घटकाच्या हालचालीचे किवा कृतीचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते त्यावेळी  त्या अलंकाराला 'स्वभावोक्ती अलंकार' असे म्हणतात.

    उदा.

    1)  मातीत ते पसरले अति रम्य पंख केले वरी उदर पांडूर निष्कलंक ||

          चंचू तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रम ही निघाले ||

    2) गणपत वाणी विडी पितांना चावायची नुसतीच कडी अन म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी.

    5) अन्योक्ती अलंकार

    Ø  कोणत्याही व्यक्तीविषयी सरळ न बोलता त्या व्यक्तीविषयी दुसऱ्याला उद्देशून बोलून बोलणारा आपले मनोगत व्यक्त करतो तेव्हा त्या अलंकारास 'अन्योक्ती अलंकार किवा अप्रस्तुत अलंकार' असे म्हणतात.

    Ø  दुसऱ्यास उद्देशून केलेली उक्ती

    उदा.

    1)  सरड्याची धाव कुंपणापर्यंत.

    2)  येथे समस्त बहिरे बसतात लोक
    का भाषणे मधुर तू करिशी अनेक
    हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
    कोकील वर्ण बघुनि म्हणतील काक

    7) अपन्हुती अलंकार

    Ø  या अलंकारात एखादी वस्तू ही उपमेय नसून उपमानच आहे असा आरोप केला जातो तेव्हा त्यास 'अपन्हुती अलंकार' असे म्हणतात.

    Ø  उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो.

    Ø  पहिले चरण नकारदर्शक असते किवा प्रश्न केलेला असतो .

    उदा.

    1)  हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले ।

    2)  ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे ।।

    3)  ते डोळे, नत्र छे ! विलासगृह की माहेर वीच्छक्तिचे

    4)   हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल ।
     हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ।।

    5)  आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी
    ती हाक येई कानी मज होय शोक भारी
    नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी 

     

    8) अनन्वय अलंकार

    Ø  जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही फक्त उपमानाची च उपमा द्यावी लगते तेव्हा त्यास 'अनन्वय अलंकार' असे म्हणतात.

    Ø  जेव्हा उपमेय आणि उपमान एकच असतात.

    Ø  उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.

    उदा.

    1)  अर्जुनासारखा वीर अर्जुनच.

    2)  आई सारखी प्रेमळ आईच.

    3)    आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी.

    4)    या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान.

    9)व्यतिरेक अलंकार

    Ø  उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेथे वर्णन असते  तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो."

    Ø  जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असते तेव्हा त्यास 'व्यतिरेक अलंकार' असे म्हणतात.

    उदा.

    1)  सांज खुले सोन्याहून पिवळे, हे उन पडे.

    2)  देवाहुनही महान आहे माझी आई.

    3)  अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.

    4)  कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान

    5)  सावळा ग रामचंद्र | रत्नमंचकी झोपतो

    त्याला पाहून लाजून | चंद्र आभाळी लोपतो

    6)  तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतळ |

    पाणियाहुनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।

    10) दृष्टांत अलंकार

    Ø  विशिष्ट विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास त्यास 'दृष्टांत अलंकारअसे म्हणतात.

    1)  लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा |

     

    अलंकार - marathi vyakaran alankar
    अलंकार - marathi vyakaran alankar

    11) चेतन गुणोक्ती अलंकार :

    Ø  निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन केले जाते त्यास 'चेतन गुणोक्ती अलंकार' असे म्हणतात.

    Ø  जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानून ती, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार होतो.

    1)  चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करीना, काही केल्या फुलेना

    2)    डोकी अलगद घरे उचलती । काळोखाच्या उशीवरूनी ।।

    3)    मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे ।।

    4)    आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला

     

    12) अर्थान्तरन्यास अलंकार

    Ø  एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त मांडणे.

    (अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )

    उदा.

    1)  एका हाते कधीतरी मुली वाजतेय काय टाळी ?

    2)  कठिण समय येता कोण कामास येतो ?

    3)    तदितर खग भेणे वेगळाले पळाले
    उपवन-जल-केली जे कराया मिळाले
    स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
    कठिण समय येता कोण कामास येतो?

    4)    सावळा वर बारा गौर वधूला .

    5)    मूळ स्वभाव जाईना.

     

    13) सार अलंकार 

    Ø  एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे.

    1)  विदयेविना मती गेली | मतीविना नीती गेली |

    नितीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |

    वित्तवीना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविदयेने केले. |

    2)    काव्यात नाटके रम्य, नाटकांत शकुंतला
    त्यामध्ये चवथा अंक, त्यातही चार श्लोक ते

     

    14)  व्याजोक्ती अलंकार

    Ø  जेव्हा एखाद्या व्याक्यामध्ये एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याला 'व्याजोक्ती अलंकार' असे म्हणतात.  (व्याज + उक्ती = खोटे बोलणे) 

    उदा.

    1)  येता क्षेण विभोणाचा, पाणी नेत्रामध्ये दिसेल, डोळ्यात काय गेले ?

     

     

     

     

    15) व्याजस्तुती अलंकार

    Ø  जेव्हा एखाद्या वाक्यात बाहेरून स्तुती पण आतून निंदा केली जाते किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती केली गेली असे वर्णन होते तेव्हा त्यास 'व्याजस्तुती अलंकार' असे म्हणतात.

    उदा.

    1)  पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे, लाडो असा बरवा, सुगरन तु खरी 

    2)    होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती
    अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती

     

    16) असंगती अलंकार

    Ø  ज्या वाक्यामध्ये कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे वर्णन केलेले असते तेव्हा त्याला 'असंगती अलंकार' असे म्हणतात.

    उदा.

    1)    कुणी कोडे माझे उकलिल का? कुणी शास्त्री रहस्य कळविल का?
    हृदयी तुझ्या सखि, दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे
    गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला

     

    17) ससंदेह अलंकार

    Ø  जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये उपमेय कोणते आणि उपमान कोणते अशी व्दिधा अवस्था निर्माण होते तेव्हा त्यास 'ससंदेह अलंकार' असे म्हणतात.

    उदा .

    1)  कोणता मानू चंद्रमा? भूवरीचा की नभीचा?

    2)  चंद्र कोणता? वदन कोणते?

    3)  शशांक मुख की मुख शशांक ते?

     

    18) विरोधाभास अलंकार

    Ø  एखाद्या वाक्यामध्ये वर वर पहिले असता विरोध झालेला दिसतो परंतु वास्तविक पाहता तशा प्रकारचा विरोध हा नसून तो केवळ त्या ठिकाणी विरोध झाल्याचा भास असतो त्यास आपण 'विरोधाभास अलंकारअसे म्हणतो.

    1)  मरणात खरोखरच जग जगते.

    2)  सर्वच लोक बोलू लागले की, कोणीच ऐकत नाही.

    3)    जरी आंधळी मी तुला पाहते

    4)    सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही

    5)    मऊ मेणहूनी आम्ही विष्णुदास कठिण वज्रास भेदू ऐसे

     

     

     

    19)भ्रांतीमान अलंकार

    Ø  उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होते आणि तशी पुढे कृती होते.

    1)  भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे

    पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे

    घालीन अंजन अशा मतिने तटाकी

    कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी

    २) गगनाकडे पाहता झाली बहुता जनासि अभ्रमती

    तेव्हा पक्षी बाणव्याप्तकाशौदरात न भ्रमती 

    भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.

    20) पर्यायोक्ती अलंकार

    Ø  जेव्हा एखादी गोष्ट सरळ सरळ शब्दात न सांगता ती गोष्ट अप्रत्यक्ष किंवा गोल गोल फिरवून सांगितली जाते तेव्हा त्यास 'पर्यायोक्ती अलंकारअसे म्हणतात.

    1)  काळाने त्याला आमच्यापासून हिरावून घेतले,

    2)  त्याचे मामा सासरचा पाहुणचार घेत आहे.





    खालील प्रश्न सोडवा 

    १)मित्राच्या उद्यान कोणाला आनंद होत नाही ?-या वाक्यातील अलंकार ओळखा ?(वाशीम पो.भ २०१६)

    १)सार

    २)श्लेष

    ३)उपमा

    ४)अनन्वय   

    २)मुंबईची घरे मात्र लहान !कबुतराच्या खुराड्यांसारखी !या वाक्याचा अलंकार ओळखा (वर्धा पो.भ.२०१८)

    १)यमक

     २)अनुप्रास

    ३)उपमा

    ४)उत्प्रेक्षा  

    ३)आभाळागत माया तुझी आम्हावर राहूदे !या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा (उस्मानाबाद पो.भ २०१७)

    १)चेतनागुणोक्ती अलंकार

    २)यमक अलंकार

    ३)उपमा अलंकार

    ४)उत्प्रेक्षा अलंकार   

    ४)अलंकार ओळखा लेकी बोले सुने लागे (नागपूर लोह पो.भ २०१७)

    १)अतिशयोक्ती

    २)अन्योक्ती

    ३)स्वभायोक्ती

     ४)यमक   

    ५)वाटे भासे जणू हे शब्द कोणत्या अलंकारात असतात (मुंबई पो.भ २०१६)

    १)उपमा

     २)उत्प्रेक्षा

     ३)रूपक

    ४)गमक   

    ६)खालील वाक्यातील अलंकार ओळखा  मरणात खरोखर जग जगते (नागपूर आयु पो.भ २०१७)

    १)अर्थांतरन्यास

    २)विरोधाभास

    ३)व्याजोक्ती

    ४)सार  

    ७)या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान (औरंगाबाद ग्रा.पो.भ २०१७)

    १)अनन्वय

    २)स्वभायोक्ती

    ३)दृष्टानात अलंकार

    ४)अर्थश्लेष अलंकार  

     

     

    ८)आईसारखी मायाळू आईच !(पालघर पो.भ.२०१६)

    १)श्लेष

    २)अनन्वय

    ३)स्वभ्वोक्ती

     ४)दृष्टांत   

    ९)बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा (गोंदिया जि पो.भ.२०१७)

    १)यमक

    २)श्लेष

    ३)अनुप्रास

    ४)रूपक   

    १०)बोट बुडाली धरतीला. या वाक्याचे अलंकार ओळखा ?(SRPF 2 पुणे पो.भ २०१६)

    १)अतिशयोक्ती

    २)उपमा

    ३)श्लेष

     ४)उत्प्रेक्षा  

    ११)नागेश एका वाघासारखे चालत होता अलंकार ओळखा (नागपूर पो.भ.२०१७)

    १)यमक अलंकार

    २)अनुप्रास अलंकार

    ३)उपमा अलंकार

     ४)उत्प्रेक्षा अलंकार   

    १२)स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्रतारा  या वाक्यातील अलंकार ओळखा (भंडारा पो.भ २०१७)

    १)उत्प्रेक्षा

    २)उपमा

    ३)यमक

    ४)दृष्टांत   

    १३)ओठ कशाचे देठ्ची फुलल्या पारिजातकाचे या वाक्यातील अलंकार ओळखा (औरंगाबाद ग्रा.पो.भ.२०१७)

    १)व्यतिरेक अलंकार

    २)चेतन गुनोक्ती

    ३)अपन्हुती अलंकार

    ४)या पैकी नाही  

    १४)ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे या शब्द्समुहाला एक शब्द सांगा (चंद्रपूर पो.भ २०१८)

    १)उपमांत

    २)अनुपम

    ३)उपमेय

     ४)उपरांत   

    १५)खालील ओळीतील अलंकार ओळखा चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना (मुंबई आयु .पो.भ.२०१७)

    १)अपन्हुती

     २)व्यतिरेक

     ३)चेतनागुनोक्ती

     ४)शब्दालंकार

    १६)जरी आंधळी मी तुला पाहते (अलंकार ओळखा )(सिधुदुर्ग पो.भ.२०१६)

    १)विरोधाभास

     २)अर्थान्तरन्यास

    ३)उत्प्रेक्षा

     ४)सार

    १७)डोकी अलगद गरे उचलती काळोखाच्या उशीवरूनी हे  वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?(यवतमाळ पो.भ.२०१८)

    १)चेतनागुणोक्ती

    २)विरोधाभास

     ३)अतिशयोक्ती

    ४)दृष्टांत   

    १८)ती मुलगी बिरबल पेक्षा सुंदर आहे अलंकार ओळखा (SRPF 1 पुणे स.पो.भ.२०१८)

    १)असंगती

    २)श्लेष

    ३)व्यतिरेक

     ४)पर्यायोक्ती  

    १९)भाषेला शोभा आणणाऱ्या धर्माला/गुणाला काय म्हणतात ?(SRPF 1 पुणे स.पो.भ.२०१८)

    १)वृत्तरचना

    २)अलंकार

     ३)समास

    ४)छेद  

    २०)विणाचे नाक चाफेकळी प्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाक हे .......आहे (धुळे पो.भ२०१७)

    १)साम्यवाचक शब्द

     २)उपमान

    ३)उपमेय

    ४)साधारण धर्म  

     

    आपणास उपयुक्त असणाऱ्या अजून टेस्ट सोडवा :

     स्पर्धा परीक्षांसाठी - टेस्ट द्या
    श्री . वैभव धनावडे  
    पोलीस भरती /स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
    ८२८६३७८४८१

    Post a Comment

    0 Comments