Total Pageviews

Marathi Grammar || Sarvnam - सर्वनाम || प्रकार आणि टेस्ट

 Marathi Grammar || Sarvnam - सर्वनाम || प्रकार आणि टेस्ट 


             राहुल खूप हुशार मुलगा आहे . राहुल सकाळी ६ वाजता लवकर उठतो . त्यानंतर राहुल मैदानवर गेला .राहुलने  धावण्याचा खूप सराव केला . राहुल मग घरी आला . .राहुल फ्रेश झाला . त्यानंतर राहुल न्याहारी करून कॉलेज ला गेला  .

वरील परिच्छेदात प्रत्येक वाक्यात राहुलचा उल्लेख आलेला आहे . आता आपण पुढील परिच्छेद पाहू .

राहुल खूप हुशार मुलगा आहे . तो सकाळी ६ वाजता लवकर उठतो .   त्यानंतर तो मैदानवर गेला  . त्याने धावण्याचा खूप सराव केला  . तो मग घरी गेला. तो फ्रेश झाला . त्यानंतर त्याने न्याहारी करून कॉलेज ला गेला. दुसऱ्या परिच्छेदात प्रत्येक ठिकाणी राहुलचा उल्लेख न करता त्याच्या ऐवजी तो,त्याने अशा  शब्दांचा प्रयोग केला आहे . त्याच शब्दांना आपण सर्वनाम म्हणतो.

Marathi Grammar || Sarvnam - सर्वनाम || प्रकार आणि टेस्ट
Marathi Grammar || Sarvnam - सर्वनाम || प्रकार आणि टेस्ट 


मराठी व्याकरण प्रश्नसंच  -सोडविण्यासाठी येथे क्लिक करा 



      सर्वनाम

    Ø  सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द.

    Ø  नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनामअसे म्हणतात.

    Ø  नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी शब्द आपण वापरतो. त्या शब्दांना सर्वनाम म्हणतात .

    Ø  सर्वनामे नामावर अवलंबून असतात.

    Ø  सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो.

    Ø  ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.

    Ø  सर्वनामाचा उपयोग सर्व (प्रकारच्या )नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात.

    *      मराठीत मूळ 9 सर्वनाम 

          मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः

    *      लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत – तो, हा, जो.

    ·         तोतो, ती, ते

    ·         हाहा, ही, हे

    ·         जो-जो, जी, जे

    *      मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. – मी, तू, तो, हा, जो इ

    ·         मीआम्ही

    ·         तूतुम्ही

    ·         तोतो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)

    ·         हाहा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)

    ·         जोजो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)

    सर्वनामांचे एकंदर सहा प्रकार मानतात :

    1.   पुरुषवाचक सर्वनाम

    2.   दर्शक सर्वनाम

    3.   संबंधी सर्वनाम

    4.   प्रश्नार्थक सर्वनाम

    5.   सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम

    6.   आत्मवाचक सर्वनाम

     

    १) पुरुषवाचक सर्वनाम

    बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात

    1.   बोलणाऱ्यांचा (प्रथमपुरुषवाचक)

    2.   ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा(द्वितीयपुरुषवाचक)

    3.   ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा वा वस्तूंचा.( तृतीयपुरुषवाचक सर्वनामे )

    ·         व्याकरणात यांना पुरुष (यांत स्त्रियाही येतात.) असे म्हणतात. या तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.

     

    1.   प्रथमपुरुषवाचक :

     बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे .

    उदा ० मी, आम्ही, आपण, स्वतः

    1)मी गावाला जाणार

    2)आपण खेळायला जावू.

    3) स्वत: खात्री करून घ्रतो .

    4) आम्ही क्रिकेट खेळतो .

     

     

    2.         2. द्वितीयपुरुषवाचक :

    ज्याच्याशी बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे उदा० तू, तुम्ही, आपण, स्वतः

    1)    आपण कोठून आलात?

    2)    तुम्ही घरी कधी येणार?

    3)    तू काय करतोस ?

     

    3.   तृतीयपुरुषवाचक :

    ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीयपुरुषवाचक सर्वनामे उदा० तो, ती, ते, त्या आपण, स्वतः इ.

    1)    तो काल आला नव्हता .

    2)    ती खूप सुंदर होती .

    3)    संदेशने मला भेटावयास बोलावले ,स्वतः/आपण मात्र आला नाही .


    read more  IMP : आपल्या अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवावी 

    २) दर्शक सर्वनामे :

    जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम वापरले जातात त्यास दर्शक सर्वनामअसे म्हणतात.उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.

    उदा०           1  ते घर दूर आहे.

                    2     तो काळा घोडा आहे .

    ( जर कर्त्या पूर्वी हि सर्वनामे आल्यास ती दर्शक विशेषणे होतात .)

    उदा . तो घोडा काळा आहे.( दर्शक विशेषणे )

    दर्शक सर्वनाम  = सर्वनाम + नाम नाही

    दर्शक विशेषण = सर्वनाम  + नाम

    §  हे ताजे गवत आहे. ( दर्शक सर्वनाम )

    §  हे गवत ताजे आहे. ( दर्शक सर्वनाम विशेषण )

    ३) संबंधी सर्वनामे :

    वाक्यात नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविण्यासाठी जी सर्वनामे वापरतात त्यांना संबंधी सर्वनामे म्हणतात . (तो-ती-तें-ते-त्या) जें, जे, ज्या.

    1)    जे चकाकते ,ते सोने नसते .

    2)    गर्जेल , तो करील काय . ( जो गर्जेल , तो करील काय ) [ कधी कधी संबंधित सर्वनामे लिहिली जात नाहीत]

    3)    ज्याने केल , तो निस्तरेल .

    ४)प्रश्नार्थक सर्वनामे :

    ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना प्रश्नार्थक सर्वनामेम्हणतात. उदा० कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी.

    1) तुमच्यापैकी कोण धडा वाचणार?

    2) तुझ्याकडे किती रुपये आहेत?

    3) तू कोठे जातोस?

    ५) सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे : 

    कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदा.

    ·         1) कोणी कोणास हसू नये.

    ·         2) त्या पेटीत काय आहे ते सांगा.

    ·         3) कोणी यावे कोणी जावे .

    ·         4) कोण हि गर्दी !

    ·         5) कोण कोणास म्हणाले .

    या सर्वनामांना सामान्य सर्वनामे’ असेसुद्धा म्हणतात.

    ६)आत्मवाचक सर्वनामे :

    आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतःअसा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात. उदा. आपण ,स्वत: , निज

    1) मी स्वतः त्याला पाहिले.

    2) तू स्वतः मोटार हाकशील का?

    3) तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला

    4) तो आपणहोऊन माझ्याकडे आला.

    5) तुम्ही स्वतःला काय समजता?

    आपण व स्वतः 

    मुख्यत: आपण आणि स्वत: हि कर्त्यानंतर आल्यास ती आत्मवाचक सर्वनामे होतात .

    ·         कधी कधी आपण स्वत: हि जर सर्वांसाठी वापरली गेली तरी सुद्धाती आत्मवाचक सर्वनामे होतात

    उदा . स्वत: मेल्याशिवाय स्वगर दिसत नाही .

    स्वत: / आपण कष्ट केल्याशिवाय घामाची किंमत कळत नाही .



    पोलीस भरती संदर्भात फ्री counseling संपर्क करा - 8286378481

    रेग्युलर study साठी नक्की जॉईन करा - study कट्टा 

    तुम्हाला किती येत सर्वनाम  

    सर्वनाम  टेस्ट 

    प्रश्न1. तो वाघ बघ. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे?

    १)पुरुषवाचक सर्वनाम

     (२) आत्मवाचक सर्वनाम

     (३)दर्शकसर्वनाम  

    (४) संबंधीसर्वनाम


    3

    2.तुम्ही सर्वजण जेवायला बसा.अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे?

    (१) प्रथम पुरुषवाचकसर्वनाम 

     (२) द्वितीय पुरुषवाचकसर्वनाम

     (३) तृतीय पुरुषवाचकसर्वनाम  

     (४) वरीलपैकी नाही

    2

    3. सर्वनामांना ———- असेही म्हणतात.

    (१) नाम  

     (२) विशेषण

    (३) क्रियापद 

     (४)प्रतीनाम

    4

    4.तो,हा,जो हे सर्वनाम ———- नुसार बदलणारे आहे.

    (१) फक्त वचन 

    (२) फक्त विभक्ती      

    (३)फक्त लिंग    

    (४) दोन्ही लिंग आणि वचन 

    4

    5.“मी, आम्ही, आपण,स्वतः” हे———– सर्वनाम आहे.

    (१)प्रथम पुरुषवाचक   

    (२)द्वितीयपुरुषवाचक   

    (३) तृतीयपुरुषवाचक     

    (४)वरीलपैकी नाही


    1

    6.आपण मार्मिक बोलतात. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

    १)द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम 

    २)अनिश्चित सर्वनाम

     ३)प्रथम पुरुष वाचक सर्वनाम 

    ४)पुरुष वाचक सर्वनाम 

    1

    7.जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे

    १)करणे 

    २)जागृत 

    ३)कर्तव्य 

    ४)आमचे    

    4

    8.सर्वनाम म्हणजे काय ?

    अ) वाक्यात नामाच्या आधी येणारे शब्द        ब)  नामाच्या जागी येणारा विकारी शब्द    

     क) वाक्यात नामाच्या ऐवजी येणारे शब्द     ड) नामाबरोबर येणारे शब्द .

    वरीलपैकी कोणते विधान व विधाने बरोबर आहेत

    1) अ आणि ब-   

    2) फक्त ब आणि क     

    3)  फक्त क आणि ड      

    4) फक्त अ आणि ड फक्त

    2

    9.पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य कोणते?

    1) मी स्वतः त्याला पाहिले   

    2) कोणी कोणास असू नये     

    3) तो आपणहून माझ्याकडे आला   

    4)तो मोटार हाकशील का

    3

    10.ज्याच्या हाती ससा तो पारधी. यामध्ये असलेले सर्वनाम कोणत्या प्रकारची आहेत?

    1)  सामान्य   

    2) संबंधी व दर्शक     

    3) पुरुषवाचक व दर्शक      

    4) संबंधी व सामान्य

    2




    तुमच्या स्पर्धा परीक्षा साठी पुढील app नक्की download करा .




    Post a Comment

    0 Comments