रक्त-रक्तवाहिन्या-रक्तगट-टेस्ट -पोलीस भरती /दारूबंदी पोलीस
तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी ? तुमचा gs चा अभ्यास झाला आहे का ? बघा तुम्हाला पुढील प्रश्नांची
उत्तरे येतात का ? जर आली नाही तर पुढील लेख वाचा आणि त्याच्या नोट्स काढा?
![]() |
रक्त-रक्तवाहिन्या-रक्तगट-टेस्ट -पोलीस भरती /दारूबंदी पोलीस |
- रक्ताचा ph किती आहे ?
- कोणत्या रक्त वाहिन्यांवर रक्तदाब जास्त असतो ?
- रक्ताची चव कशी असते ?
- लाल रक्तपेशी किती दिवस जगतात ?
- रक्त वाहिन्यांचे प्रकार किती ?
- रक्त गटाचा शोध कोणी लावला ?
- अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात?
- घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो ?
- वरील प्रश्न स्पर्धा परीक्षांना वारंवार विचारले जातात ? तर आज आपण रक्त ,रक्तवाहिन्या ,रक्तगट आणि टेस्ट ह्या सर्व गोष्ठी पाहणार आहोत ?
लेख वाचून झाल्यावर टेस्ट सोडवा ?
रक्त (Blood):
Ø
रक्त हा संयोजी उतींचा द्रवरूप प्रकार आहे.
Ø
शुद्ध रक्ताचा रंग लाल भडक असून चव खारट असते.
Ø
रक्त आम्लारी / अल्कलीधर्मी असून त्याचा सामू (pH) 7.35 ते 7.45
आहे.
Ø
रक्त द्रवरूप तसेच स्थायूरुप घटकांचे बनलेले असते.
Ø
रक्तातील द्रवरूप भागाला रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा
असे म्हणतात.
Ø
रक्तातील स्थायूरुप भागाला रक्तपेशी असे म्हणतात.
१) रक्तद्रव्य (Plasma):
Ø
रक्तद्रव्य फिकट पिवळसर रंगाचे द्रव असून रक्तामध्ये
एकूण आकारमान 55% असते.
Ø
यामध्ये 90% पाणी तर 10% विद्राव्य
प्रथिने असतात.
Ø
विद्राव्य प्रथिनांमध्ये अल्ब्युमिन,
ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन यांचा समावेश होतो.
Ø
फायब्रिनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेत
मदत करतात.
Ø
रक्तद्रव्यामध्ये शरीरातील प्रथिनांची बचत होते.
Ø
रक्तातील बायकार्बोनेट्समुळे कार्बन डायॉकसाईड चे वहन
होण्यास मदत होते.
Ø
रक्तद्रव्यातील गोठविणाऱ्या घटकांव्यतिरिक्त असलेल्या
भागाला ब्लड सिरम किंवा शुद्ध रक्त असे म्हणतात.
२) रक्तपेशी (Blood Cells):
Ø
आपल्या रक्तातील पेशींना हिमॅटोसाईट्स असेही म्हणतात. रक्तपेशींचे ३ प्रकार आहेत.
i) तांबडया रक्तपेशी/ लोहित रक्तकणिका (Red Blood Cells/Erythrocytes):
Ø
तांबडया रक्तपेशींचा आकार अंडाकृती तसेच
द्विअंतर्वक्री असतो.
Ø
या पेशींमध्ये केंद्रक आणि तंतूकणिका नसतात. त्यामुळे
जास्तीत जास्त हिमोग्लोबिनचे रेणू सामावू शकतात. या पेशींमध्ये हेमिक
आयर्न (लोह) चे आयन असतात. त्यामुळे रक्ताला लाल रंग
प्राप्त होतो.
Ø
यांचा व्यास 6-8 मायक्रो मीटर असतो, तर यांची जाडी 2-2.5 मायक्रो मीटर असते.
Ø
मानवी रक्तात 50-60 लाख (20-30 ट्रिलियन) तांबडया रक्तपेशी असतात.
यांची निर्मिती अस्थिमज्जेत (Bone Marrow) होते.
Ø
या पेशींना परिपकव होण्यासाठी 7 दिवस तर यांचा
कार्यकाळ 120 दिवस असतो.
एकूण आयुष्यमान 127 दिवस असते.
Ø
तांबडया रक्तपेशी कार्यकाळ संपल्यानंतर प्लिहेमध्ये
नाश (Spleen) पावतात.
Ø
तांबडया रक्तपेशींना एक रक्ताभिसरणाचे चक्र पूर्ण
करण्यासाठी 20
सेकंदाचा कालावधी लागतो.
Ø
एका तांबडया रक्तपेशींच्या सुमारे 270 मिलियन
हिमोग्लोबिनचे रेणू असतात.
Ø
हिमोग्लोबिन या प्रथिनांमुळे 98% पेक्षा जास्त ऑक्सिजनचे वहन केले जाते तर 2% ऑक्सिजन रक्तद्रव्यात विरघळतो.
Ø
शरीरातील एकूण 65% लोहापैकी तांबडया रक्तपेशीत 2.5%
लोह असते.
ii) पांढऱ्या रक्तपेशी/ श्वेत रक्तकणिका (White Blood Cells/Leucocytes):
- पांढऱ्या पेशी
अनियमित आकाराच्या असतात.
- पांढऱ्या पेशींचा
आकार 10-20 मायक्रो मीटर असतो.
- या पेशींमध्ये
कुठलेही वर्णक नसते म्हणून यांना वर्णकहीन पेशी (Leucocytes) असे म्हणतात. यांची निर्मिती अस्थिमज्जा
(Bone Marrow) मध्ये तसेच प्लिहेमध्ये होते.
- शरीरात साधारणपणे 5-10 हजार पांढऱ्या पेशी असतात.
- शरीरातील
पांढऱ्यापेशींची संख्या रोगांसाठी निर्देशक मानली जाते.
- पांढऱ्या पेशींची
संख्या प्रमाणापेक्षा वाढल्यास ल्युकोसायटोसीस तर प्रमाणापेक्षा कमी झाल्यास ल्युकोपेनिया हे रोग होतात.
पांढऱ्या पेशींचे एकूण पाच प्रकार असतात.
१) न्युट्रोफिल (Neutrophil):
२) इसायनोफिल (Eosinophil):
३) बॅसोफिल (Basophil):
४) लिम्फोसाईट (Lymphocyte):
५) मोनोसाइट (Monocyte):
iii) रक्तपट्टिका/ चपट्या पेशी (Blood Platelets):
Ø
रक्तपट्टिका लहान गोलाकार, तबकडी च्या आकाराचे असतात.
Ø
यांचा आकार 2-3 मायक्रो मीटर असून रंग फिकट पिवळसर असतो.
Ø
यांची निर्मिती अस्थिमज्जेत होत असते. तसेच यांना थ्रोम्बोसाईट्स असेही म्हणतात. आपल्या रक्तात साधारणपणे 2.5-4 लाख रक्तपट्टिका असतात.
Ø
शरीरात अभिसरण होणाऱ्या रक्तपट्टिकांचे आयुष्यमान
5-9 दिवस असते.
Ø
जुनाट/ जीर्ण झालेल्या रक्तपट्टिका पेशीय भक्षण
क्रियेने प्लिहा आणि यकृतामध्ये नाश पावतात.
Ø
रक्तपट्टिकांमुळे रक्त गोठण्यास किंवा जखमा भरण्यास
मदत होते.
Ø
रक्तातील रक्तपट्टिकांची संख्या कमी झाल्यास अचानक
रक्तस्त्राव होतो यालाच थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणतात.’
Ø
रक्तातील रक्तपट्टिकांची संख्या जास्त झाल्यास थ्रोम्बोसायटोसीस हा रोग होतो.
Ø
रक्तपट्टिकांमध्ये तीन प्रकारचे कण असतात. डेल्टा, लॅम्डा,
अल्फा
Ø
रक्तपट्टिकांमधून सायटोकाइन्स आणि केमोकाइन्स हि पदार्थ स्रवतात.
रक्त-रक्तवाहिन्या-रक्तगट-टेस्ट -पोलीस भरती /दारूबंदी पोलीस |
पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री || Police Bharti Success Formula
रक्तवाहिन्या (Blood Vessels):
रक्तवाहिन्या आपल्या शरीरात
रक्ताचे अभिसरण करतात. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी सुमारे 97 हजार किमी
असते. रक्तवाहिन्यांचे तीन मुख्य प्रकार पडतात.
१) धमन्या (Arteries)
२) शिरा (Veins)
३) केशिका (Capillaries)
१) धमन्या (Arteries) :
ü
हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन करतात. अपवाद –
फुफ्फुसधमनी (Pulmonary
Artery)
ü
भित्तिका जाड असून कमी लवचिक असतात.
ü
शरीरात खोलवर स्थित असतात व झडपा नसतात.
ü
रक्तदाब खूप जास्त म्हणजेच 100 mm Hg एवढा
असतो.
ü
महाधमनी – धमन्या – धमनिका
२) शिरा (Veins) :
ü उतींकडून कार्बन डायॉकसाईड
युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करतात. अपवाद – फुफ्फुसशिरा (Pulmonary Veins)
ü भित्तिका पातळ असून जास्त लवचिक
असतात.
ü शरीरात त्वचेखाली स्थित असतात व
झडपा असतात.
ü रक्तदाब खूप कमी म्हणजेच 2 mm Hg एवढा
असतो.
ü महाशिरा -शिरा – शिरिका
३) केशिका (Capillaries) :
ü
धमनिका आणि शिरिका यांच्या पेशीतील जाळ्याला केशिका
असे म्हणतात.
ü
केशिका अत्यंत बारीक, एकस्तरीय असून भित्तिका पातळ असतात.
ü
केशिकांमुळे पेशींमध्ये पोषद्रव्ये, ऑक्सिजन,कार्बन डायॉकसाईड, विकरे, संप्रेरके
तसेच टाकाऊ पदार्थांची देवाण – घेवाण घडून येते.
रक्तगट (Blood Groups):
ü रक्तातील प्रतिजन (Antigens) आणि
प्रतिद्रव्ये (Antibodies) या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे
वेगवेगळे गट पाडले आहेत.
ü रक्तगटांचे A, B, AB, आणि O
असे चार मुख्य प्रकार आहेत. त्यांपैकी A, B, आणि O यांचा शोध इ. स. १९०० साली लँडस्टेनर (Dr.
Karl Landsteiner) यांनी लावला,
ü तर उरलेला चौथा AB रक्तगट
डीकास्टेलो आणि स्टर्ली (Decastellor And Sturli) यांनी १९०२
मध्ये लावला.
ü लँडस्टेनर यांना या शोधाबद्दल
१९३० साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.
रक्तगट |
प्रतिजन |
प्रतिद्रव्य |
A |
A |
b (Anti B) |
B |
B |
a (Anti A) |
AB |
A & B |
None |
O |
None |
a & b |
रक्त पराधान (Blood Transfusion):
एखाद्या व्यक्तीचे रक्त दुसऱ्या
व्यक्तीच्या शरीरात सोडण्याच्या क्रियेस रक्त पराधान म्हणतात.
रक्तगट |
ला रक्त देवू शकतात |
च्या कडून रक्त घेऊ शकतात |
A |
A आणि
AB |
A आणि
O |
B |
B आणि AB |
B आणि
O |
AB |
AB फक्त |
सर्व रक्तगट |
O |
सर्व रक्तगट |
O फक्त |
Ø AB रक्तगट असलेल्या
व्यक्तीस सर्वयोग्य ग्राही (Universal
Recipient) असे
म्हणतात. AB रक्तगटाचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे.
Ø तसेच O रक्तगट असलेली
व्यक्ती कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीस रक्त देऊ शकते, म्हणून
O रक्तगट असलेल्या व्यक्तीस सर्वयोग्य दाता (Universal Donar) असे
म्हणतात. O रक्तगटाचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे.
रक्तदान (Blood Donation):
Ø
एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी
सुमारे ३ महिन्यांचा कालावधी ग्राह्य मानला जातो.
Ø
ब्लड डोपिंग – एखाद्या व्यक्तीचे रक्त काढल्यानंतर पुन्हा
त्याच व्यक्तीला रक्त देण्याची क्रिया
Ø
एका वेळेस रक्तदान – ३००
खालील टेस्ट सोडवा
https://drive.google.com/file/d/1RQ7GWRNjxxINnzXdgOtqObxG0nbKE-u2/view?usp=drive_link
आपणास उपयुक्त असणाऱ्या अजून टेस्ट सोडवा :
टेस्ट करा तुमचे gk
1)
तांबड्या रक्तपेशी .......... मध्ये तयार होतात . (ठाणे
चालक -२०१९)
1)
यकृतामध्ये
2) छोट्या आतड्यामध्ये
3)
मूत्रपिंडामध्ये
4)अस्थिमज्जेमध्ये
2)रक्तातील कोणत्या
पेशींना सैनिकी पेशी म्हणतात ? (सोलापूर चालक ग्रा.२०१९)
1) श्वेत रक्तकणिका
2) लोहित रक्तकणिका
3) रक्तबिंबिका
4) रक्तपट्टिका
3) रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे
.........
1) धमनीकाठीण्यता
2)
परीह्रदरोग
3) अतिलठ्ठपणा
4) उच्चताण
4) मानवी शरीरातील लाल रक्तकानिकांची निर्मिती कोठे होते? (सांगली 2019)
1) अस्थिमज्जा
2)जठर
3)यकृत
4) प्लीहा
5 ) रक्तग्लुकोज पातळी सामान्यतः कोणत्या
एककात दर्शवली जाते. (बीड 2018 )
1) पाऱ्याचे मिमी
2)मिलिग्रॅम
प्रति डेसीलिटर
3)भाग प्रति दशलक्ष
4)ग्रॅम प्रति लिटर
6) रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी
कोणती संज्ञा लागू होते?( एसआरपीएफ नवी मुंबई 2018 )
1) ल्युकेमिया
2) हिपॅटोमा
3)ऑस्त्रीओ
साकोमा
4)लायपोसकोमा
7) एखादी व्यक्ती एकदा रक्तदान
केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो ?(बुलढाणा 2017 )
1) 15 दिवसांनी
2) एक
महिना
3)दोन
महिने
4) तीन महिने
8) खालीलपैकी कोणता रक्ताचा घट नाही?
1) A
2)B
3)AB
4) AO
9) बालकाचा रक्तगट AB असल्यास पालकाचा रक्तगट कोणता असेल?
1) A आणि O
2) B आणि O
3) AB आणि O
4) A आणि B
10) ऑक्सीजन युक्त रक्त कशाद्वारे
हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते.
1) महाशिरांमार्फत
2) महाधमनीमार्फत
3)फुफ्फुस धमनीमार्फत
4) यापैकी नाही
0 Comments