Total Pageviews

महत्त्वाची एकके, महत्वाची उपकरणे आणि त्यांचे उपयोग || important units

महत्त्वाची एकके, महत्वाची उपकरणे आणि त्यांचे उपयोग  || important units 

        स्पर्धा परीक्षा आणि सामान्य अध्ययन घट्ट नात आहे . सामान्य अध्ययनातील महत्त्वाचा घटक सामान्य विज्ञान . विज्ञानातील काही मुलभूत घटक आपण या भागातून पाहणार आहोत .जसे कि महत्त्वाची एकके ,  महत्वाची उपकरणे आणि त्यांचे उपयोग  || important units. हे घटक तुम्ही  पाठांतर करून ठेवलेच पाहिजे .

महत्त्वाची एकके, महत्वाची उपकरणे आणि त्यांचे उपयोग  || important units
महत्त्वाची एकके, महत्वाची उपकरणे आणि त्यांचे उपयोग  || important units 


    भौतिक राशी आणि त्यांची एकके

    भौतिक नियमांच्या साह्याने ज्या राशी व्यक्त केल्या जातात त्यांना भौतिक राशी म्हणतात.

     राशींचे दोन प्रकार

    • 1)    सदिश राशी
    •  ज्या राशी व्यक्त होण्यासाठी परिणाम आणि दिशा दोन्हींची गरज असते त्या राशींना सदिश राशी   असे म्हणतात.

    उदा . विस्थापन,बल,वेग,त्वरण,संवेग,वजन


    • 2)     आदिश राशी
        • ज्या राशी व्यक्त होण्यासाठी केवळ परिणामाणे स्पष्ट होतात  त्या राशींना सदिश राशी असे   म्हणतात.  उदा.वस्तुमान,आकारमान,तापमान,चाल,घनता,लांबी,रुंदी,अंतर, कार्य,इत्यादी.


    एककांचे प्रकार :

    1)    1)  मुलभूत एकक : 

                ज्या राशींचे एकेक दुसऱ्या राशींवर अवलंबून नसतात.त्यांना मुलभूत एकके म्हणतात.

     एकूण सात मुलभूत एकके आहेत .


    मुलभूत राशी                         मुलभूत एकके                 चिन्ह


    लांबी                                   मीटर                                m


    वस्तुमान                               किलोग्राम                       kg


    वेळ                                     सेकंद                              s

    तापमान                                केल्विन                         k


    विध्युतधारा                            अॅम्पिअर                     A


    प्रकाशाची तीव्रता                  कॅन्डेला                         cd


    पदार्थ्याचे प्रमाण                     मोल                             mol

     

    2)    2)  साधित एकक : 

            जे एकक दोन किंवा दोन पेक्षा अधिक मुलभूत एककापासुन तयार होते त्यांना साधित एकक म्हणतात.

    उदा मीटर/सेकंद , न्यूटन/मी2

     



    एकक मोजण्याच्या पद्धती  

    1)  CGS पद्धत – सेंटीमीटर (c) , ग्रॅम(G) , सेकंद (S)

    प्रथम संकल्पना – कार्ल गॉस इ.स.1832

     

    2) MKS पद्धती – मीटर (M) , किलोग्रॅम( K), सेकंद (S)

    यालाच मेट्रिक पद्धत देखीक म्हणले जाते. यात मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद ही एकके वापरली जातात. MKS पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. म्हणून त्यांना SI पद्धत (System International) देखील म्हणतात.

     

    3) FPS पद्धती – यात फूट, पौंड आणि सेकंद ही एकके वापरलेली आहेत.

     

     You Must Read

    महत्त्वाची एकके

    • फॅदम- समुद्राची खोली मोजण्यासाठी  ( 1 फॅदम = 6 फुट = 1.8288मी)
    • हॅड- घोड्याची उंची मोजण्यासाठी
    • नॉट – जहाजांची गती  ( 1 नॉटिकल – 6076 फुट)
    • बॅरेल  -द्रव्य मोजण्यासाठी  ( 1 बॅरेल   =
    • हयशिड – मद्य मोजण्यासाठी
    • कॅरेट – सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी
    • गाठ – कापूस मोजण्यासाठी
    • बार- वायुदाब मोजण्यासाठी
    • अॅगस्ट्रोग -प्रकाश लहरींची लांबी मोजण्यासाठी
    • न्यूटन -  बलाचे एकक
    • ओहम- विद्युतरोध
    • अम्पिअर- विद्युतधारा
    • कुलोम-विद्युतप्रभार
    • व्होल्ट- विभवांतर
    • डेसिबल- आवाजाची तीव्रता
    • प्रकाशवर्ष – ग्रह ,तारे यांच्यातील अंतर मोजण्यासाठी
    • दस्ता- कागदांची संख्या
    • हॉर्सपॉवर- यंत्राची शक्ती मोजण्यासाठी
    • केल्विन- तापमान
    • सेल्सिअस- तापमान
    • फॅरनहाइट- तापमान
    • बार- वायुदाब
    • डायॉप्टर- भिंगाची शक्ती
    • हर्ट्झ – वारंवारिता

     

     

    राशी

    MKS(SI) एकक

    CGSएकक

    चाल

    मीटर/सेकंद

    सेंटीमीटर/सेकंद

    वेग

    मीटर/सेकंद

    मीटर/सेकंद

    त्वरण

    मीटर /सेकंद 2(M/s2)

    सेंटीमीटर/सेकंद2( cm/s2)

    बल

    न्यूटन

    डाइन


     

     

    कार्य

    ज्युल   (n/m)

    अर्ग

    उर्जा

    ज्युल

    अर्ग

    शक्ती

    वॅट

     

    वजन

    न्यूटन

    डाइन

    उष्णता

    किलो कॅलरी

     

    दाब

    पास्कल

    बारी(Ba)

     संवेग 

     किलो मी /से 

     

     

    महत्त्वाची एकके, महत्वाची उपकरणे आणि त्यांचे उपयोग  || important units 

    महत्वाची उपकरणे आणि त्यांचे उपयोग

    • डायनामोमीटर-    इंजिनाची विशिष्ट शक्ती मोजण्याचे उपकरणे
    • हॉट एअर ओव्हम-           अधिक तापमान वाढविणारे उपकरण
    • कॉम्युटर-            क्षणात प्रचंड आकडेमोड करणारे यंत्र
    • रेफ्रीजरेटर-          तापमान 4 से. पेक्षा कमी राखणारे उपकरण
    • स्पिडोमीटर-        गोलकार चाके असलेल्या वाहनाने काटलेले अंतर मोजण्याचे उपकरण
    • हायड्रोफोन-         पाण्याखाली ध्वनीचे आंदोलन मोजणारे उपकरण
    • टेलेस्टार-            तारांच्या सहाय्याशिवाय अवकाशातून ध्वनीलहरी प्रक्षेपीत करणारे उपकरण.
    • टाईपराईटर-        टंकलेखनाच्या सहाय्याने कागदावर मजकूर लिहणारे उपकरण
    • टेलीग्राफ-           सूर्य किरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या सहाय्याने संदेश वाहनासाठी वापरले जाणारे उपकरण.
    • अल्टीमीटर-        समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
    • ऑक्टोक्लेव्ह-     दाब देऊन वस्तू निर्जंतुक करण्याचे उपकरण.
    • सिस्मोग्राफ-        भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र
    • अॅमीटर-             अॅम्पीयरमध्ये विद्युतप्रवाह मोजण्यासाठी.
    • अॅनिमोमीटर-       वार्‍याचा वेग व दाब मोजण्यासाठी
    • गायग्रोस्कोप-      वर्तुळाकार भ्रमण करणार्‍या वस्तूची गती मोजणारे उपकरण.
    • पायरोमीटर-        उच्च तापमान मोजण्यासाठीचे उपकरण
    • बॅरोमीटर-           हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण
    • टेलिप्रिंटर-           तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण.
    • मायक्रोस्कोप-      सुक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
    • क्रोनीमीटर-         जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ.
    • लॅक्टोमीटर-        दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.
    • कार्डिओग्राफ-     हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.
    • सायक्लोस्टायलिंग-छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.
    • कार्बोरेटर-           पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.
    • मॅनोमीटर-           वायुचा दाब मोजणारे उपकरण
    • ऑडिओमीटर-    ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी
    • मायक्रोफोन-        ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.
    • रडार-                 रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.
    • हायड्रोमीटर-        द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
    • मायक्रोमीटर-       अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी बी.ओ.डी.
    • थर्मोस्टेट-           ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.
    • थिअडोलाईट-     उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी.
    • स्टेथोस्कोप -       हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. •
    • ऑडिओमीटर-    श्रवणशक्तीतील फरक ओडखने.
    • इलेक्टॉकार्डिओग्राफ-            हृदयाच्या स्पंदनांचा आलेख 
    • इंक्यूबेटर –         20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण
    •  सेस्मोग्राफ -       भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
    • फोटोमीटर -        प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
    •  हायग्रोमीटर -     हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
    •  हायड्रोमीटर -     द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
    • हायड्रोफोन -       पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण
    •  बॅरोमीटर (वायुभारमापक)-            हवेचा दाब मोजणे.
    • बायनॉक्युलर (द्विनेत्री दुर्बीण)-         दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळी दूरची वस्तू पाहता येते.
    •  केलक्युलेटर (परिगणक) -            गणिती आकडेवारी करण्याचे यंत्र.
    •  कलरिमीटर(कॆलरीमापी)   -           द्रवाच्या उष्णेतेचे प्रमाण मोजणे.
    •  थर्मामीटर-(ज्वरमापी)-                  शरीराचे तापमान मोजणे.
    • कलरिमीटर (वर्णमापी)-                 रंगांच्या तीव्रतेतील फरक मोजणे.



    मराठी व्याकरण  : हे अलंकार आपणास माहित आहेत का ? त्यांच्यावर आधारित उदाहरणे आपण वाचलीत का ?

    मग नक्की वाचा . येथे क्लिक करा 

    Post a Comment

    0 Comments