Total Pageviews

पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री || Police Bharti Success Formula

 पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री  || Police Bharti Success  Formula 

    तुम्ही पोलीस भरतीची किंवा अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर मग हा लेख  वाचायलाच हवा. आपल्या पैकी काही जन हि प्रस्तावना न वाचा सरळ कोणता नक्की फोर्मुला आहे तो शोधण्यासाठी खाली खाली स्क्रोल करतील.  अस केलत तर तुमची मानसिकता हि कोणता हि मुद्दा समजून घेण्याची नाही हे दिसून येते. तुम्हाला यशस्वी व्हयला मग खूप वेळ लागू शकतो . आज पर्यंत अनेक मूलं पोलीस भरतीत यशस्वी झाली आहेत. त्यांच्याकडून तुम्ही यशाचा फोर्मुला किंवा टिप्स तुम्ही विचारल्या देखील असतील. त्यांनी त्यांच्या यशस्वी झाल्याच्या काही टिप्स काही गोष्टी सांगितल्या असती . तुम्ही त्या काही दिवस अमलात आणल्या असतील . नंतर मात्र येरे माझ्या मागल्या झाल असेल.  असो जगात असा कोणता यशाचा फोर्मुला असतो का ? तर नक्कीच असतो मात्र तो ज्याने त्याने स्वतः स्वतःचा तयार करायचा असतो. तोच फोर्मुला तुमचा पोलीस भरतीचा तयार करण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. यश हे काही एका रात्री , फोर्मुल्यात काही गोष्टी टाकल्या  कि लगेच मिळेल अशी गोष्ट नाही. हा लेख आपण वाचताय म्हणजेच तुम्हाला पोलीस भरतीत यशस्वी व्हायचं आहे हे पक्क आहे. आज आपण  पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री  || Police Bharti Success  Formula पाहणार आहोत.


पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री  || Police Bharti Success  Formula
Police Bharti Success  Formula 


१ )  पोलीस भरती समजून घेणे: 

    प्रत्येक परीक्षेची स्वतःची अशी एक वेगळी ओळख किंवा आपण त्याला पातळी म्हणूया ती असते . तशीच पोलीस भरतीची हि आहे . उदा बेरीज ,वजाबाकी ,भागाकार हे आपल्याला इयत्ता पहिली पासून ते पुढील सर्वच इयत्तांना थोड्या मोठ्या प्रमाणात ह्या गणिती क्रिया आहेत ,परंतु त्यांची काठीण्य पातळी ही इयत्तेनुसार वेगळी असते . तसेच तुम्हाला पोलीस भरती समजून घ्यावी लागेल . आपल्या पैकी खूप विद्यार्थी कोणी सांगितले म्हणून , किंवा असाच फोर्म भरून मोकळे होता . जर आपणास खरच भरती करावीशी वाटत असेल तर त्या भारतीबाद्द्ल आधी पूर्ण जाणून घ्या . माहिती आपल्याला अकॅडमी ,पोलीस झालेले मित्र,तसेच इतर माध्यामतून तुम्ही मिळवू शकता. पोलीस भरती समजून घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं ? आपण एक एक गोष्टी पाहू . ह्या पैकी आपल्याला गोष्टी माहित असतीलच . तरी त्याच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करा . 

    1) पात्रता : 

पोलीस भरतीची पात्रता काय आहे ? हे माहित करून घेणे . पात्रता दोन प्रकारची आहे .
i) शारीरिक पात्रता   ii) शैक्षणिक पात्रता  या व्यतिरिक्त अजून एक पात्रता आहे. ती खूप गरजेची आहे ती म्हणजे ही सर्व तयारी करण्याची माझी पात्रता आहे का?, मी कार्यक्षम आहे का ? आणि नसलो तरी ती निर्माण मी करू शकतो का ?  तुम्ही तुमची कार्यक्षमता वाढवू शकता ? 

    2) अभ्यासक्रम : 
        प्रत्येक स्पर्धा परीक्षांचे विषय सारखेच असले तरी ,काठीण्य पातळी भिन्न असते . टर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यासक्रम समजून घणे गरजेचे आहे . अभ्यास करणे म्हणजेच अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे. तुमच्याकडे अभ्यासक्रमाची लिस्ट असली पाहिजे . थोडी मेहनत घेऊन अभ्यासक्रमाच अलोकन कराव .

    3) आरक्षण / कागदपत्रे : 
        कोणत्याही सरकारी परीक्षांमध्ये कागदपत्रे हा महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही तुम्हाला आरक्षण असलेल्या जातीला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची यादी लिहून ती कागदपत्रे तयार ठेवावी . कागपात्रांच्या अभावी काहीना परीक्षा देता येत नाही तर काहीना सिलेक्शन होऊन सुद्धा त्यांची अंतिम निवड होत नाही . म्हणून तुमची कागदपत्रे तयार ठेवा .

    4) मैदानी चाचणीचे गुणांकन : 
पोलीस भरतीचा हा महत्त्वाचा टप्पा आहे . त्यात असलेले इव्हेंट्स कोणते आहेत ते समजून घेणे आणि त्यांचे गुणांकन कसे आहे समजून घेणे .

5) लेखी परीक्षेचे स्वरूप : 
लेखी परीक्षेचे स्वरूप समजून घेणे. प्रश्न विचारण्याची पद्धत,कोणत्या विषयावर जास्त भर दिला जातो, कोणते प्रश्न सातत्याने विचारले जातात,तुम्ही ज्या जिल्ह्यात पेपर देणार आहात त्या जिल्ह्याचे मागील पेपर पाहणे इत्यादी .

वरील सर्व गोष्टी  ह्या पोलीस  पोलीस भरतीच्या बेसिक गोष्टी आहेत .ह्या तुम्ही भरती करण्याअगोदर समजून घेतल्या पाहिजेत .तुम्ही तुमच्या पोलीस झालेल्या मित्रांकडून किंवा या फिल्ड मध्ये ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडून समजून घेऊ शकता . एखादी पोलीस अकॅडमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांच्या कडून पोलीस भरतीच्या गोष्टी समजून घेऊ शकता .

पोलीस भरती संदर्भात फ्री counseling संपर्क करा - 8286378481

रेग्युलर study साठी नक्की जॉईन करा - study कट्टा 


 पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री  || Police Bharti Success  Formula 



२) मैदानी /लेखीचे नियोजन करणे :

पहिल्या टप्प्यात आपण पोलीस भरती काय आहे ? ती तुम्ही समजून घेतल्यानंतर तुमचे  काम चालू होते .तुमचा खरा प्रवास चालू होतो तो पोलीस होण्याच्या दिशेकडे. ही दिशा योग्य असली पाहिजे .नाहीतर दिशाहीन भरकटलेले तरुण तरुणी खूप आहेत .योग्य मार्गदर्शक हवा . आपण जीवापाड ,बेधुद मेहनत करत असतो परंतु त्याला  योग्य मार्गदर्शन,दिशा नसेल तर क्षमता असून ही आपण पोलीस बनू शकत नाही .

मैदानी चाचणीचे नियोजन / सराव :  हा पोलीस भरतीचा पहिला टप्पा आहे . तुम्ही मैदानीला किती इव्हेंट्स आहेत ,किती गुणांसाठी आहेत हे सर्व माहिती करून घेतल्यानंतर त्याचा कसून सराव करणे गरजेचे आहे ? जो इव्हेंट आहे त्या संबंधित सर्व सराव त्याची तयारी हि झालीच पाहिजे . स्वत: तयारी करत असाल किंवा एखाद्या ट्रेनरकडे जात असला तरी स्वच्या प्रगतीचा आलेख नेहमी तपासत जा . महिन्यातून एकदा किंवा दोनदा मैदानी चाचणीचा डेमो द्या .सर्वांसोबत द्या म्हणजे स्वतःला कळेल कि मला किती अजून सुधारण्याची गरज आहे . स्वतःला लागेल वेळ नोंद करत चला . 

लेखी चाचणीचा सराव :  लेखी तसा मुलांना अवघड वाटणारा टप्पा .ह्या टप्प्यावर मुलांना गाळनीचे प्रमाण जास्त असते . अभ्यासक्रम समजून घेतल्यावर त्याची प्रत्यक्षात सुरुवात करा .सोपे वाटणाऱ्या विषयांपासून सुरुवात करा . जेणे करून तुमचा उत्साह वाढेल . सुरुवात करताना सर्व विषयांतले सर्व धडे पोलीस भरतीला असणारे बेसिक पासून करा .उगाच सुरुवातीला  अवगडच्या मागे लागू नका .

1) सर्व विषय बेसिक पक्का करा.

2) धडा झाल्यानंतर त्यावर भरतीला विचारले प्रश्न सोडवा 

3)  झालेले पेपर सोडवणे , त्याचे विश्लेषण करणे ,चुकलेले प्रश्न विचारत घेऊन तो पूर्ण धडाच पुन्हा करावा .

4)  संभाव्य पेपर चा सराव करावा.

फक्त पोलीस भरती लेखी तयारी Download app Now - Click Here 



३) सातत्य : .

    कोणतेही क्षेत्र असो सातत्याला पर्याय नाही. आपण म्हणतो ना सरावाणे माणूस परिपूर्ण होतो .तेच  एखाद्या गोष्टीत सातत्य ठेवल्याने आपण नक्कीच यशस्वी होतोच.आपण शालेय जीवनात शिकलेला एक धडा पुन्हा सांगतोय   , ससा-कासवाच्या शर्यतीचा. सातत्य असेल, तर आपल्यापेक्षा बलवान आणि प्रभावी प्रतिर्स्पध्यालाही मात देता येते, हे आपण कासव आणि ससा यांच्या गोष्टीतून शिकलो . अर्थात, त्यापैकी किती जणांनी तो खरोखरी आचरणात आणला, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. सांगायचे तात्पर्य एवढेच की, सशाने सुरुवातीला कितीही फुशारकी मारली असली, तरी केवळ सातत्याच्या जोरावर कासवाने त्याचा गर्व उतरवला.  सातत्य हा गुण वैयक्तिक आलेख उंचावण्यासाठी किती महत्त्वाचा आहे.हे तुम्हाला कळले असेलच. 
सातत्य हे लेखी आणि मैदानी या मध्ये पाहिजेच .
ह्या ऐका सूत्रावर तुम्ही पोलीस बनू शकता .


श्री . वैभव धनावडे  
पोलीस भरती /स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
८२८६३७८४८१



तुमच्या स्पर्धा परीक्षा साठी पुढील app नक्की download करा .



तुमचे सामान्य ज्ञान अभ्यासू शकता .

सोडवा सामान्य अध्ययन टेस्ट 

1. जन्मनोंदणी ही जन्मानंतर ........ दिवसाच्या आत करणे बंधनकारक आहे?

A)सात

B) पंधरा

C) एकवीस

D) तीस

पर्याय :- C


2. PCPNDT हा कायदा....... शी संबंधीत आहे?

A)जन्मदर

B) मृत्युदर

C) बालमृत्युदर

D) स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तर

पर्याय :- D


3. दवाखान्यात प्रसुती झाल्यास बाळास किती तासाच्या आत Hepatitis ची लस देण्यात येते ?

A)२४

B)३६

C)७२

D)४८

पर्याय :- A


4. जागतिक सिकलसेल दिवस या तारखेला साजरा केला जातो?

A)१९ जुन

B)११ जुलै

C)१ डिसेंबर

D)५ ऑगस्ट

पर्याय:- A


5. पहिली आशियाई खेळ 1951 मध्ये कोठे आयोजित केले होते ?

      A) बीजिंग

      B) नवी दिल्ली 

      C) सीयोल

      D) टोकियो 

पर्याय:- B

6 : भारतातील कोणत्या शहरा मधील सर्वात जुनी मेट्रो आहे ?

      A) बंगलोर

      B) कोलकाता 

      C) मुंबई

      D) दिल्ली 

पर्याय:- B


7 . क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो ?

      A) बेरीबेरी

      B) मुडदूस

      C) रातांधळेपणा

      D) स्कर्व्ही 

पर्याय:- D

8 . मणिपूर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?

      A) कोहिमा

      B) आगरताळा

      C) इंफाळ 

      D) शिलाँग 

पर्याय:- C

9. कऱ्हेचे पाणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

    A) लोकमान्य टिळक    

    B) वि. स. खांडेकर        

   C) प्र. के. अत्रे               

  D) चि. वि .जोशी

पर्याय:- C

10.'बलुतं' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) विश्राम बेडेकर    

B)शंकर पाटील    

C) डॉ. नरेंद्र जाधव 

  D) दया पवार

पर्याय:- D


आपणास उपयुक्त असणाऱ्या अजून टेस्ट सोडवा :

 स्पर्धा परीक्षांसाठी - टेस्ट द्या
श्री . वैभव धनावडे  
पोलीस भरती /स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
८२८६३७८४८१

Post a Comment

0 Comments