Total Pageviews

Marathi vyakaran- nam ani namache prakar

 Marathi vyakaran- nam ani namache prakar

मराठी व्याकरण – नाम व नामाचे प्रकार


स्पर्धा परीक्षांची तयारी करताना मराठी व्याकरणाचा अभ्यास हा तसा वरचे वर सोपा वाटणारा विषय वटतो . परंतु जस जसे परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रशाची पातळी पाहतो तेव्हा मात्र आपल्याला तो विषय थोडा अवघड वटायला लागतो. आपल्या या examworld24 मध्ये हेच विषय घटक समजून घेणार आहोत .

तर आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातील महत्वाची जात नाम या जातीचा परिपूर्ण अभ्यास करणार आहोत. marathi vyakarana nam ani namache prakar बघणार आहोत.

    Marathi vyakaran- nam ani namache prakar
     Marathi vyakaran- nam ani namache prakar



    नाम

    *      सृष्टीतील कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजे नाम.

    *      जगातील अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तू/प्राणी आणि त्यांच्या गुणधर्म यांना दिलेली जि नावे आहेत . त्यांना नाम असे म्हणतात .

     

    नामाची वैशिष्टे :

    *       नाम या जातीती शब्द संख्या जास्त आहे .

    *      म्हणजेच नाम ह्या शब्दाच्या जातीतील शब्दांपेक्षा शब्द जास्त आहेत

     

     

    नामाचे मुख्य ३ प्रकार आहेत

    1) सामान्य नाम

     2) विशेष नाम 

    3)भाववाचक नाम

     

    1). सामान्य नाम ज्या नामाच्या योगाने जाती किंवा गटाचा बोध होत असेल त्यास सामान्य नाम म्हणतात.

    उदा० नदी , पर्वत , शाळा , बँक, वाघ ,पोपट, मुलगा, माणूस, ग्रह, तारे, शहर, गाव, इत्यादी.

    *      वैशिष्टे

    ·         सामान्य नाम हे जातीवाच असते.

    ·         सामन्य नाम अनेकवचनी असतात

    सामान्य नामाचे २ प्रकार :

    1. पदार्थ वाचक जे घटक शक्यतो लिटरमध्ये, मीटरमध्ये किंवा ग्रॅममध्ये मोजले जातात, त्यांना पदार्थ वाचक नाव म्हणतात.

    उदा० तांबे ,मीठ ,दूध, तेल, पाणी, कापड, गहू, सोने, चांदी इत्यादी

     

    2. समूह वाचक ज्या नामाच्या योगाने समूहाचा बोध होतो त्यास समूह वाचक नाम म्हणतात .

    उदा कलप,गंज मोळी, जुडी, ढिगार, कळप, टोळी इत्यादी.

     

      Marathi vyakaran- nam ani namache prakar

     

    2. विशेष नाम ज्या नामाच्या योगाने विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम म्हणतात.

    उदा० राम गोदावरी, हिमालय, ताजमहाल, पृथ्वी, , इत्यादी.

    *      वैशिष्टे

    ·         विशेष नाम हे व्यक्ती वाचक

    ·          एकवचनी असतात उदा राम

     [ सामान्य नाम व विशेष नाम यांना धर्मी वाचक नामे म्हणतात ]

     

     Read More : गणितातील महत्वाची सूत्रे 


    रेग्युलर स्टडी साठी/upadate साठी
    Join now   क्लिक  *Study कट्टा* 



    3. भाववाचक नाम/धर्म वाचक नाम

    ज्या नामाच्या योगाने गुण,धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाव म्हणतात, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नामाला भाववाचक नाम म्हणतात.

    उदा गरिबी, सौंदर्य, शत्रुत्व, गर्व, थकवा, इत्यादी.

     

    भाववाचक नामाचे ३ प्रकार

    1) गुणदर्शक उदा . धूर्तपणा, सौंदर्य, प्रामाणिकपणा, चतुराई/चातुर्य

    2) स्थितिदर्शक गरिबी, श्रीमंती, स्वातंत्र्य इ

    3) कृतिदर्शक चोरी, चळवळ, क्रांती,शांती इ.

    प्रत्यय वापरून तयार झालेले भाव वाचक नामे

    गिरी : गुलाम गुलामगिरी, दादा दादागिरी, फसवा फसवेगिरी

    आई : नवल नवलाई, चपळ चपळाई, चतुर चतुराई दिरंग – दिरंगाई

    : सुंदर सौंदर्य, गंभीर गांभीर्य, शूर शौर्य, नवीन नावीन्य, चतुर चातुर्य

    त्व : शत्रू शत्रुत्व, मित्र मित्रत्व, प्रौढ प्रौढत्व, नेता नेतृत्व

    पण / पणा : देव देवपण, बाळ बालपण, शहाणा शहाणपण

    : श्रीमंत श्रीमंती, गरीब गरिबी, गोड गोडी

    ता : नम्र नम्रता, वीर वीरता, बंधू बंधुता

    की : पाटील पाटीलकी, माल मालकी, गाव गावकी

    वा : थकणे – थकवा गोड गोडवा, गार गारवा, ओला ओलावा

    वी : थोर थोरवी

     

    Marathi vyakaran- nam ani namache prakar

     Read More : गणितातील महत्वाची सूत्रे भाग 1 

     

    v  नामाचे इतर उपयोग

    1. सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :

    1)    आमचे  पोपटराव  कालच गावाला गेला.

    (पोपट हे सामान्य नाम आहे परंतु यथे ते विशेष नाम आहे कारण वाक्यात विशेष व्यक्तीचे नाव पोपट आहे )
    2) आत्ताच तो नगरहून आला.

     ( नगर – शहर  सामान्य नाम – परंतु वाक्यात नगर म्हणजे अहमदनगर होय . )
    3)आमची बेबी नववीत आहे.

    4) शेजारची तारा यंदा बी.ए. झाली

     

    2. विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :

    1) आमची बायको म्हणजे लक्ष्मी.
    2) तुमची मुलगी त्राटिकाच दिसते.
    3) आईचे सोळा गुरुवारचा व्रत आहे.

    4) आमच्या वर्गात तीन पाटील आहेत .

    5) आमच्या मुलांमध्ये आम्हाला भीम हवेत , सुदामा नकोत .

    6) तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.

    7)आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.

    v  नारद- कललावणारा , कुंभकर्ण – झोपाळू , भीम – बलवान व्यक्ती , सुदाम – हडकुळा मनुष्य , जमदग्नी – रागीट मनुष्य , यांसारख्या विशेष नामांचा उपयोग वाक्यात सामान्य नामासारखा करतात

    v  एखाद्याला नाव ठेवण्यासाठी , उपमा देण्यासाठी किंवा तुलना केली असेल तर ते सामन्य नाम असते .

    v  विशेष नामापुढे संख्या आल्यास ते सामान्य नाम असते .

    v   विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात

     

    3. भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग :

    1) नम्रता हि माझी मोठी बहिण आहे .

    2) शांती माझ्या भावाची मुलगी आहे.
    3)माधुरी सामना जिंकली.
    ४) विश्वास परीक्षेत पास झाला.



     

     टेस्ट द्या पुढे क्लिक करा   :  मराठी व्याकरण

                                               समाजसुधारक भाग 1 

     



    v  साधित नामे

    1) धातुसाधित नाम :

    धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामाप्रमाणे वापर केल्यास त्यास धातुसाधित नाम म्हणतात

    1)    त्याचे वागणे चांगले नाही.( वाग –धातू )

    2)    ते पाहून मला रडू आले. ( रड-धातू )

    3)    त्याचे बोलणे काहीसे ठीक नव्हते .( बोल – धातू )

    4)    देणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावे.( दे ,घे – धातू )

     

     

    2) विशेषण साधित नामे

    विशेषणांचा उपयोग नामाप्रमाणे केल्यास ती विशेषण साधित नामे होतात .

    विशेषणांना विभक्ती प्रत्यय लागू शकतात .

    1)     म्हाताऱ्या माणसाला चळ भरतो. (विशेषण) - म्हाताऱ्याला चळ भरला ( विशेषण साधित नाम )

    2)  श्रीमंत माणसांना गर्व असतो .( विशेषण ) – श्रीमंतांना गर्व असतो . ( विशेषण साधित नाम )

    3)  शहाण्या माणसाला  शब्दांचा मार .( विशेषण )- शहाण्याला शब्दांचा मार

     

     

    3)  अव्यय साधित नाम .

    1)      आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.

    2)      त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.

    3)      नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.

     

    टेस्ट द्या -पुढे क्लिक करा :

    घड्याळ भाग 1 

    घड्याळ भाग 2 



    स्वराज्य पोलीस अकॅडमी -  कांदिवली  (पु) मुंबई 
    भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र - 
    निवासी बॅच उपलब्द 

    ८२८६३७८४८१ / ९०७५८१७१०७

    Post a Comment

    0 Comments