Total Pageviews

अभ्यासाच्या सोप्या पायऱ्या || imp Steps

अभ्यासाच्या सोप्या पायऱ्या  || imp Steps 



खाली दिलेली प्रथम टेस्ट सोडवा

 

    वरील टेस्ट आपण सोडवली असेल . काही जणांनी प्रामाणिकपणे तर काही जणांनी फुकट टेस्ट आहे म्हणून फक्त सोडवायची म्हणून सोडवली असेल. त्यात त्यांना किती प्रश्न हे कोणत्या topic मधले आहेत,कोणत्या प्रकारातील आहेत . से सर्व बरोबर माहित असेल ,तर त्यांचे सहजासहजी प्रश्न चुकणार नाहीत. याचा अर्थ त्यांची अभ्यासाची दिशा योग्य रीतीने चालली आहे . प्रश्न आहे ज्यांचा अभ्यास झाला आहे असा त्यांना वाटत ,ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे त्यांचा . काही मूल खूप अभ्यास करतात, दिवस रात्र तरी सुद्धा त्यांना चांगले गुण मिळत नाहीत किंवा भरतीमध्ये निवड होत नाही . मग अशा मुलांनी स्वतः मध्ये डोकून बघितल पाहिजे, आपल्याकडून कोणत्या चुका होतायत ,माझ्या अभ्यासाची पधदत चुकतेय का ? या सर्व गोष्टींचा विचार करून त्यात सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत.


read more  IMP : आपल्या अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवावी 

काही उद्भवणारे प्रश्न

  • अभ्यास नक्की कसा करायचा ?
  • कोणत्या नोट्स /पुस्तकं वाचायची ?
  • टेस्ट कधी आणि किती सोडवाव्या
  • अभ्यासात मन लागत नाही ?
  • शिकवलेले लक्षात राहत नाही ?
  • शिकवताना सर्व समजत पण नंतर विसरायला होत
  •  हे प्रश्न किंवा समस्या ह्या मुलांच्या असतात .
  • अभ्यास म्हणजे काय ?

आपण हेच या लेखातून जाऊन घेणार आहोत. अभ्यास नक्की कसा करायचा ? या पुढील लेखात आपण वरील सर्व विषय हाताळणार आहोत.

अभ्यासाची वेळ :

प्रत्येकाच्या अभ्यास करण्याच्या वेळा वेगळ्या असतात.तुम्हाला ज्या वेळेला अभ्यास चांगला होतो अस तुम्हाला वाटत ती योग्य वेळ. शाळेतील मुलांच्या अभ्यासाच्या वेळा ह्या त्यांच्या शाळेच्या वेळेनुसार ठरत असतात . परंतु आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल ,पोलीस भरतीचा अभ्यास करत असला तर तुमच्या वेळेच गणित हे बसवावच लागेल . अस म्हणतात राम प्रहरी वाचलेलं लक्षात राहत .तुम्हाला तुमची वेळ कोणती ती ठरवून घ्यावी लागणर आहे .एकदा का तुमच्या अभ्यासाच्या वेळा ठरल्या कि  मग मात्र तुम्हाला त्या वेळा 100 % पालायाच्याच आहेत . कोणतीही कारणे तुम्ही स्वतःला तरी देऊ नका . 

 

पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री  || Police Bharti Success  Formula 

अभ्यासाच्या पायऱ्या अभ्यासन्यापूर्वी आपण अभ्यास म्हणजे नेमक काय हे समजून घेऊ ?

    तुमच्या दृष्टीकोनातून सरांनी जो काय होम वर्क दिला आहे तो करणे म्हणजे अभ्यास होय . पण आपण शालेय जीवनात नाही तरस्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आहोत म्हणून आपली अभ्यासाची पद्धत बदली पाहिजे . अभ्यास म्हणजे आपलाल्या द्यायच्या असलेल्या  (पोलीस भरती,तलाठी,psi ,zp) परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे . म्हणजे अभ्यास होय .तुम्ही तुमची परीक्षा समजून घ्या अभ्यासक्रम जो आहे त्याच्या परिपूर्ण अभ्यास ( वाचन,लेखन,पाठांतर ) करा.

अभ्यासाच्या सोप्या पायऱ्या  || imp Steps 

आपण एक अभ्यासाची पद्धत बघूया

1) प्रकरण पूर्ण वाचणे :



    तुम्ही जे प्रकरण अकॅडमीत किंवा अन्य माध्यमातून शिकलात .ते प्रकरण शिकवून झाल्यावर तुम्ही स्वतः पूर्ण वाचणे . ही पायरी अत्यंत महत्वाची आहे . कारण तुम्ही आधी शिकलेल्या गोष्टी जेव्हा प्रकरणात वाचता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी, काही संकल्पना स्पष्ट होत जातात .त्यामुळे ही स्टेप घणे गरजेचे आहे . ते प्रकरण कोणते हि असो अगदी गणिताचे जरी असेल तरी प्रकरणाच्या सुरुवतीला ज्या काही महत्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या असतात त्या वाचाव्या .

 

2) त्या प्रकरणावरील प्रश्न सोडवणे :



प्रकरण पूर्ण वाचून झाल्यावर त्या प्रकरणावरील प्रश्न सोडवणे . आपण आपल एक प्रकरण झाल कि लगेच दुसऱ्या प्रकरणावर उडी मारतो . तस न करता आपण त्या प्रकारांवरील प्रश्न सोडवले पाहिजेत . या आधी या प्रकरणावरील प्रश्न जे परीक्षेला येऊन गेले आहेत ते सोडविण्यावर सुरुवातीला प्राधान्य द्यावे . जेणे करून तुमचा आत्मविश्वास वाढीस लागतो . जर एखादा प्रश्न अडकत असेल तर मागे बघून तो सोडवा . जे प्रश्न तुम्हाला प्रकरण वाचून सुटत नसतील त्या प्रश्नांना खुणा करून ठेवा किंवा दुसऱ्या वहीत लिहून ठेवा . ते पहिल्या फेरीत सोडवू नका .

       i.            प्रकरणावरील प्रश्न सोडवणे

     ii.            तुम्ही देत असलेल्या मागील सर्व परीक्षेतील प्रकरणावरील प्रश्न सोडवणे 

 

3) संदर्भ पुस्तकातून ते प्रकरण पुन्हा अभ्यासणे :



तुम्ही जे प्रकरण ज्या पुस्तकातून वाचलेलं आहे किंवा अभ्यासलेल आहे ते तेच प्रकरण त्याच विषयाचे दुसऱ्या पुस्तकातून त्या प्रकरणाचा अभ्यास करणे .  समजा एखाद मराठीच  प्रकरण तुम्ही बाळासाहेब शिंदे यांच्या पुस्तकातून अभ्यासले आहे तर तेच प्रकरण तुम्ही  मराठीच्या मो रा. वाळिंबे सरांच्या पुस्तकातून अभ्यासा . जेणे करून तुमच्या सर्व संकल्पना स्पष्ट होतील . या यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत घेऊ शकता . असच दुसऱ्या विषयांच्या बाबतीत करू शकता .

 

 

4) अवघड प्रश्न नोट करून ठेवणे :



    वर म्हटल्या प्रमाणे तुम्ही प्रश्न सोडवत असताना तुम्हाला कठीण प्रश्न ही सापडतील त्यांची नोंद करून घेणे . संदर्भ ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला त्यातील काही प्रश्नांची उकल होईल. एखादा प्रश्न सुटला नाही तर सरळ तुमच्या शिक्षकांकडे न जाता ,प्रथम तुम्ही पुस्तक ,संदर्भ ग्रंथ ,नोट्स वापरून सोडविण्याचा प्रयत्न करा . तुमच्या कल्पना शक्तीला वाव द्या .तुमच्या विचार करण्याच्या कक्षा रूंदावतील.

 

 तुमच्या स्पर्धा परीक्षा साठी पुढील app नक्की download करा .

x

Post a Comment

0 Comments