Total Pageviews

मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा

  मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा



हृदय हा आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे . तो  रक्ताभिसरण संस्थेतील एक महत्वाचा अवयव आहे . संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे . ते पंपाप्रमाणे कार्य करते . हृदयाचे कार्य आणि त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत. त्याचबरोबर हृदयावर स्पर्धा परीक्षांसाठी विचारलेले प्रश्न पहाणर आहोत . तुम्हाला त्याची टेस्ट ही सोडवायची आहे .

  1. हृदयाचे  वजन किती  ?
  2. मानवी ह्रदयाला कप्पे किती ?
  3.  ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी कशाचा  वापर केला जातो.?

या सारखे वेगवेगळे प्रश्न हृदयावर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारातच . या आणि इतर प्रश्नाची उत्तरे या लेखात तुम्हाला मिळणार आहेत.

    Examworld24 येथे तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स , फ्री टेस्ट ,इतर सर्व  परीक्षांची माहिती उपलब्ध होईल त्यासाठी आताच या site ला follow  करा .

    खाली दिलेली टेस्ट सोडवा :

    1) हृदय हे कोणत्या संस्थेचे इंद्रिय आहे?

    1) श्वसनसंस्था    

    2) रक्तभिसरण    

    3) उत्सर्जन 

    4) मज्जासंस्था


    2) हृदयहे खालील पैकी कशाप्रमाणे कार्य करते ?

    1) मोटर

    2) सायकल

    3) पंप

    4) पाईप

     

    3)मानवी हृदयात एकूण किती  कप्पे आहेत .

    1) चार

    2) दोन

    3) तीन

    4) पाच


    4) ऑक्शिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या कप्प्यात येते ?

    1) डावे अलिंद   

    2) डावे निलय    

    3) उजवे निळय  

    4) उजवे अलिंद


    5) जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना काय म्हणतात ?

    1) टेस्टटुब बेबी 

    2) रेड बेबी 

    3) ब्लू बेबी

     4) या पैकी नाही

     

    6) हृदायचे  ठोके मोजण्यासाठी कोणत्या उपकारांचा उपयोग करतात ?

    1) ECG

      2) Statoscope

     3) CT Scanner

      4) Sphygmomanometer


    7)  रक्तदाब कोणत्या  उपकरणाच्या सह्यायाने मोजतात. ?

    1) स्फिग्मोमॅनोमिटर   

    2)हायड्रोमीटर 

     3) कार्डीओग्राफ 

     4) फोटोमीटर


    8) निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो ?

    1) 100/80       

    2) 160/80  

     3) 120/80

      4) 70/110


    9) हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात. ?

    1) कार्डीऑलॉजी   

    2) पॅथॉलॉजी  

    3)  अॅनाटॉमी   

    4)न्यूरॉलॉजी


    10) हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात ?

    1) पेनेसिलीन

    2) सल्फोन 

    3) क्लोरोमायसिटीन

    4) ऍस्पिरिन


    11) भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण कोणी घडवून आणले. ?

    1) डॉ. पी. वेणुगोपाल   

    2) डॉ.जगदीशचंद्र बोस 

    3) डॉ खुराना 

    4) डॉ.एस .पी चंद्रशेखर


    उत्तरे : लेख पूर्ण संपल्यावर - टेस्ट लिंक खाली दिली आहे ती आपण सोडवावी .

     पोलीस भरती /तलाठी /इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी येथे visitनक्की करा - क्लिक करा 


    मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा
      मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा

    हृदय (Heart) काही महत्त्वाचे मुद्दे

    • हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे
    • हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे.
    • मानवी हृदयात एकूण चार कप्पे आहेत .
    • हृदयातील झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.
    • हृदयाचा आकार हा मानवाच्या स्वतःच्या मुठी एवढा असतो .
    • हृदयाचे वजन पुरुषांमध्ये हृदयाचे वजन ३४० gram असते आणि स्त्रीच्या २५५ gram असते.
    • ठोके मोजण्यासाठी Stethoscope वापरला जातो.
    • ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ECG (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो.
    • Cardiology म्हणजे हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणतात.
    •  Cardiologist म्हणजे हृदयाचा डॉक्टरला म्हणतात.
    • हृदयावर हृदयस्नायू असतात.
    • हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ऍस्पिरिन औषध वापरतात

     

     

    आपल्या शरीरात हृदय कोठे असते ?

        मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.

    वजन : पुरुष – ३४० ग्रॅम्स स्त्री – २५५ ग्रॅम्स

    हृदयाचे कार्य :

    • आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
    •  हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे.
    •  त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.
    • संपूर्ण शरीरभर ऑक्सिजनचा पुरवठा करणे
    • संप्रेरके ,पचलेले पोषण द्रवे हे पेशीपर्यंत वाहून नेणे
    • टाकाऊ पदार्थ उस्तर्जक इंडियाकडे वाहून नेणे
    • शरीराचे तापमान कायम स्थिर ठेवणे
    • रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणे
    For More study visit here - https://examworld24.blogspot.com/

    हृदयाचा आकार कसा असतो ?

    हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू  नी बनलेले असते.

      मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा

    हृदयाची रचना:

     वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे चार कप्पे असतात.)

     

    मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा
     मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा

      मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये

    १) डावे  अलिंद

    २) उजवे  अलिंद

    3) डावे निलय

    ४) उजवे  निलय

    • अलिंदांच्या भिंती पातळ असतात,
    •  निलय जाड भिंतीची बनलेली असतात.

    उजव्या अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित रक्त आणले जाते.

    १) ऊर्ध्व शिरारक्त गुहा

    २) अधोशीरा रक्त गुहा

    ३) परिमंडली शिरानाल

    हृयाच्या स्नायूंना परिहृद धमनी (Coronary Artery) द्वारे रक्त पुरविले जाते.

    सोडवा आणि वाचा  : रक्त-रक्तवाहिन्या-रक्तगट-टेस्ट -

    हृदयाची कार्यपद्धती :

          अलिंदांचे व निलयांचे लयबद्ध आकुंचन व प्रसरण सतत होत असते. मात्र अलिंद व निलय एकाच वेळी आकुंचन किंवा प्रसरण पावत नाही. ज्यावेळी अलिंदे आकुंचन पावलेली असतात त्यावेळी निलये मात्र प्रसरण पावलेली असतात. त्याचप्रमाणे, ज्यावेळी निलये आकुंचन पावलेली असतात त्यावेळी अलिंदे प्रसरण पावलेली असतात.

    •  हृदयाच्या आकुंचनाला Systole म्हणतात, तर हृदयाच्या प्रसारणाला Diastole म्हणतात.
    • १ मिनिटात ५ लिटर रक्त pumping करतात

     रक्तभिसरणाचा मार्ग: 

    शरीरात हृदयाच्या एका ठोक्यादरम्यान हृदय रक्ताभिसरणाच्या दोन क्रिया घडवून आणते 

    १) फुफ्फुस रक्तभिसरण 

    २) देह रक्तभिसरण

    १) फुफ्फुसी रक्तभिसरण 

    या क्रियेमध्ये ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडून फुफ्फुसांकडे नेले जाते व ते जेथे ऑक्सिजनयुक्त झाल्यावर परत हृदयाकडे आणले जाते.

    ही क्रिया खालीलप्रमाणे घडते 

    शरीराच्या सर्व भागाकडून उजव्या अलिंदात आलेले ऑक्सिजनविरहित रक्त ->उजव्या निलयामध्ये ->तेथून फुफ्फुस धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे उच्च दाबाने पोहोचविले जाते -फुफ्फुसांमध्ये वायूंची अदलाबदल होऊन रक्त ऑक्सिजनयुक्त बनते -ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुस शिरांद्वारे हृदयाच्या डाव्या अलिंदाकडे

    २) देह रक्ताभिसरण 

    या क्रियेमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते आणि पेशींकडून ऑक्सिजनविरहित आणि कार्बन डायॉकसाईडयुक्त रक्त जमा केले जाऊन ते हृदयाकडे परत आणले जाते.

    ही क्रिया खालीलप्रमाणे घडते 

    डाव्या अलिंदात जमा झालेले ऑक्सिजनयुक्त रक्त -डाव्या निलयात उतरते -जात भिंतींचे डावे निलय उच्च दाबाने त्यास महाधमनीत पाठवते -तेथून ते शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते->तेथे वायूंची अदलाबदल होते आणि ऑक्सिजनविरहित रक्त उर्ध्व आणि अधोशिरांद्वारे उजव्या अलिंदात जमा होते.

    https://examworld24.blogspot.com/

    रेग्युलर स्टडी साठी/upadate साठी


    हृदयाचे ठोके:

    हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय.

    • एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात.
    • प्रोढ व्यक्तींमध्ये ७२ ठोके आणि स्रियामध्ये ७८ ते ८२ ठोके
    • झोपेत असताना – ५५ ठोके / मिनिट
    • लहान मुलांमध्ये – १२०-१६० ठोके/ मिनिट
    • ठोक्याची आवाजातील तीर्वता १५ Decibel होय
    • कोणत्याही निरोगी व्यक्तीमध्ये हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण दर मिनिटास ६0 ते 100 इतके असते.

    हृदयाचे ठोके वाढण्याची कारणे -  तणाव, व्यायाम, विशिष्ट औषधाचे सेवन यामुळे होते.

    • ठोके मोजण्याचे उपकरण स्टेस्थेस्कोपच्या साह्याने मोजतात .
    • स्टेथेस्कोपचा शोध रेने लैनक याने लावला 
    • हृदयाचे आकार प्रत्येक व्यक्तीचे हृदय हे त्याच्या मिटलेल्या मुठीएवढे साधारणपणे त्रिकोणाकृती असते

     

    अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी खालील उपकरणांचा वापर करतात .

    1) ECG – Electro Cardio Gram ठोक्यांच्या स्पन्दनांचा आलेख

    2) CT Scan – Computerised Tomography

    3) MRI – Magnetic Resonance Imaging

    रक्तदाब 

    •    रक्तदाब Sphygmo manometer मध्ये मोजतात.
    •   साधारण रक्तदाब (Normal B.P.) = 120/80 mm Of Hg असतो. तर हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी तो 80 mm of Hg असतो.
    •   उच्च रक्तदाब (High B.P.) = 160/95 mm of Hg पेक्षा जास्त
    •   कमी रक्तदाब (Low B.P.) = 100/60 mm of Hg पेक्षा कमी रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे असतो.

          धमनी -केशवाहिन्या – शिरा / नीला


     marathi Grammar book -buy now  

    हृदाविषयी काही महत्त्वाची इतर माहिती :

    हृदय प्रत्यारोपण

    मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा
     मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा

    पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री  || Police Bharti Success  Formula 



    •    पहिले हृदय प्रत्यारोपण 3 डिसेंबर 1967 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ख्रिश्चन बर्नार्ड यांनी Groote Schuur Hospital येथे घडवून आणले.
    •   भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण डॉ. पी. वेणुगोपाल यांनी घडवून आणले.
    •  भारतातील पहिली Open Heart Surgery – Christian Medical Collage, Vellore (1959)येथे घडवून आणण्यात आली.

     मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा

    हृदयरोग

    •    जन्मतःच हृदयात दोष असणे 
    •    जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.

     

     

     मानवी हृदय कार्यप्रणाली -हृदय स्पेशल टेस्ट - स्पर्धा परीक्षा

     

     

    हृदय विकाराचा झटका म्हणजे काय?

     हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होणे व त्यामुळे हृदयाचा स्नायू निकामी होणे याला हृदयविकाराचा झटका असे म्हणतात.

     

    १०० % रक्तपुरवठाचे विभाजन

    हृदयाकडून शरीराला होणाऱ्या 100% रक्तपुरवठ्याचे वर्गीकरण

    • २८% यकृत
    • २४% वृक्क किवा किडनीमेंदू
    • १५% स्नायू
    • १४ %मेंदू
    • १९ % इतर भागांना

     स्पर्धा परीक्षांसाठी - टेस्ट द्या

    हृदय स्पेशल टेस्ट सोडवा : 


    उत्तरे :
    1) - 2
    2) -3
    3)- 1
    4)-1
    5)-3
    6)-2
    7)-1
    8) -3
    9)1
    10)-1
    11)-1


     

     

    Post a Comment

    0 Comments