Total Pageviews

मराठी साहित्य प्रकार | लेखक,कवी यांची टोपण नावे आणि त्याचं साहित्य | marathi Writer

 मराठी साहित्य प्रकार | लेखक,कवी  यांची टोपण नावे आणि त्याचं साहित्य |  marathi Writer

मराठी साहित्य संपदा विविध प्रकारची असून खूप वेगवेगळे प्रकार मराठी साहित्यात हाताळले गेले आहेत. त्यामुळे मराठी साहित्य संपन्न झाले आहे. आज आपण मराठी साहित्य विश्वतील ह्या साहित्य बदल जाणून घेणार आहोंत. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने लेखक आणि त्याची टोपणनाव , लेखक आणि त्यांचे साहित्य यावर हमखास प्रश्न विचारले जातात. शिवाय कधी कधी साहित्य प्रकारावर ही प्रश्न विचारले जातात. मराठी साहित्य प्रकार | लेखक,कवी  यांची टोपण नावे आणि त्याचं साहित्य |  marathi Writer
मराठी साहित्य प्रकार | लेखक,कवी  यांची टोपण नावे आणि त्याचं साहित्य |  marathi Writer
मराठी साहित्य प्रकार | लेखक,कवी  यांची टोपण नावे आणि त्याचं साहित्य |  marathi Writer


आपण काही साहित्यातील प्रकार पाहूया

    कादंबरी-

    कादंबरी एक लांबलचक एकच संपूर्ण पुस्तकात कथा असते. या कथेची लांबी मोठी असते. एखादं पात्र घेऊन ही लिहिली जाते. हा साहित्य प्रकार मराठीत खूप लेखकांनी हाताळला आहे. मराठीत खूप साऱ्या आतापर्यंत कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत.

    मराठीतील पहिली कादंबरी- यमुना पर्यटन(इ. स. १८५७), लेखक - बाबा पदमनजी.

    आत्मचरित्र-

    आत्म म्हणजे स्वतः. एखादा लेखक स्वतःच्या जीवनात अनुभवले अनुभव, स्वतःचं त्याने आतापर्यंत व्यथित केलेलं जीवन पुस्तक रूपाने सांगत असतो. अशा पुस्तकास आत्मचरित्र म्हणतात. आत्मचरित्र समाजातील थोर व्यक्ती,लेखक ,जे लेखक नसतात ते सुद्धा आत्मचरित्र लिहीत असतात.

    यशवंतराव चव्हाण यांचे  आत्मचरित्र - कृष्णकाठ या नावाने प्रसिद्ध आहे.

    Read More : भारतातील व्याघ्र  प्रकल्प आणि टेस्ट 

    कविता-

    थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या मनातील भाव,अनुभव,वर्णन हे पद्यात लिहिणे. हा एक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे.  मानवामध्ये नवरस आहेत या नवरसांचा  आणि अलंकाराचा वापर करून आपले विचार अनुभव वर्णन अत्यंत कमी शब्दात थोडक्यात मांडणे म्हणजेच कविता.

     कविता हा व्यक्त होण्याचं एक एक प्रभावी माध्यम आहे . आपल्या मराठी साहित्यात असंख्य मोठे कवी होऊन गेले ज्ञानेश्वरांपासून तुकोबांपासून ते आत्तापर्यंत नवकवी पर्यंत मराठीला कवितेची मोठी परंपरा लाभलेली आहे . बहिणाबाईंची ओव्या, तुकोबांचे अभंग, अनंत फंदी यांचे फटके, संत एकनाथांचे गवळणी भारुडे , ना. धो महानोरांचे निसर्ग वर्णने हे सर्व कवितेचा भाग आहे. कवितांचे विविध प्रकार आहेत. प्रेमगिते, भूपाळ्या इत्यादीखालील हे काही कवितेचेच प्रकार आहेत. 

    ओव्या, अभंग,बडबडगीते,भजन,गौळणी , भारुडे, फटके,गझल,अखंड,पोवाडे, चारोळ्या, लावण्या  इत्यादी.

    •  अभंग- हा साहित्य प्रकार संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या कविता ह्या अभंग प्रकारातील आहेत. मुक्तछंद अक्षरवृत्त यांचा हा प्रकार आहे. संतांनी देवाच्या भक्ती बरोबरच अभंगातून समाजाचे प्रबोधनही केले आहे.   
    • गौळण - संत एकनाथांच्या साहित्य प्रकारत गौळणी आपल्याला आढळतात.कृष्णाच्या लिला, त्याची भक्ती ह्या कवितेतून आपल्याला आढळते.    
    •  भारुडे - सध्या सध्या उदाहरणातून नैतिक  तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांना ज्या काव्यातून,गीतातून दिले जाते त्यानां भारुडे म्हणतात. संत एकनाथांच्या साहित्य संपदेत भारुडे आहेत. इतर संतांनी ही हा प्रकार हाताळलेला आढळतो.   
    • पोवाडे - शूर वीरांच्या  कथा गीतांच्या माध्यमातून सांगणे
    •   गझल- हा प्रकार इस्लामी संस्कृती कडून आलेला प्रकार आहे.हा काव्य प्रकार असून तो एक गायन प्रकार ही आहे.   

    •  भजन  आरत्या - देवांची स्तुती ,विनवणी प्रार्थना 
    • चारोळी- चार ओळींची कविता   
    • लावण्या- शृंगार रस वापरून केलेला हा पद्यप्रकार आहे.

    read more  IMP : आपल्या अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवावी 

    समिक्षा-

        एखाद्या साहित्यकृतीचे, चित्रपटाचे, नाटकाचे, नृत्याचे , संगीताचे परीक्षण करून त्याचे गुणदोषांचे विस्तृत विवेचन करून लेखन करून मांडणे याला समीक्षा असे म्हणतात. थोडक्यात वेगळा शब्द टीका हा हि आहे. या प्रकारात समीक्षक स्वतःचे मत त्या चित्रपटाबद्दल किंवा साहित्य बद्दल मांडत असतो.


    नाटक-

    नाटक म्हणजे एखाद्या वास्तव स्थितीचे किंवा काल्पनिक, पौराणिक, ऐतिहासिक घटनांचे प्रत्यक्ष रंगमंचावर अभिनयाद्वारे संवादात्मक किंवा संगीतात्मक सादरीकरण करणे म्हणजे नाटक होय. लेखक किंवा नाटककार एखादी गोष्ट ती पौराणिक काल्पनिक किंवा ऐतिहासिक संवाद रूपात लिहून पुस्तक तयार करतो. त्यास आपण नाटक म्हणतो. नाटकांची मोठी परंपरा आहे . खूप सारी अजरामर नाटके रंगमंचावर सादर केली गेली आहेत. नटसम्राट, सखाराम बाईंडर, तो मी नव्हेच, मोरूची ची मावशी, श्रीमंत दामोदर पंत , सही रे सही इत्यादी नाटकांचे विविध प्रकार आहेत. त्यांच्या लांबीनुसार नाटकांचे प्रकार पडतात. त्यास  अंक असे म्हणतात . दोन अंकी , तीन अंकी,  एक अंकी छोटी कथा असेल तर एका अंकामध्ये संपवल्या जातात त्याला एकांकिका असे म्हणतात.  संगीत नाटक, एकपात्री, प्रायोगिक, व्यावसायिक  इत्यादी . भरतमुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहून भारतीय नाट्य संस्कृतीचा पाया घातला होता.

     

    बालसाहित्य-

    खास किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेले साहित्य म्हणजे बालसाहित्य होय. लहान मुलांच्या गोष्टी इत्यादींचा याच्यात समावेश होतो. राजा राणीच्या गोष्टी, जादूगर , राक्षस, परिकथा, इत्यादी कथा या साहित्यात असतात. शिवाय बालकविता बडबड साहित्य.


    अग्रलेख-

    एखाद्या वर्तमानपत्राच्या संपादकाने समाजात चालू असलेल्या परिस्थिती वर किंवा एखाद्या विषयावर लिहिलेला लेख. याला संपादकीय लेख असेही म्हणतात.वर्तमानपत्रात विविध लेख असतात.

     

    मराठी साहित्यक आणि त्यांची टोपणनावे :

    लेखक /कवी

    टोपणनाव

    कृष्णाजी केशव दामले

    केशवसुत

    गोविंद विनायक करंदीकर

    विंदा करंदीकर

    त्रंबक बापूजी डोमरे

    बालकवी

    प्रल्हाद केशव अत्रे

    केशवकुमार

    राम गणेश गडकरी

    गोविंदाग्रज / बाळकराम

    विष्णू वामन शिरवाडकर

    कुसुमाग्रज

    निवृत्ती रामजी पाटील

    पी. सावळाराम

    चिंतामण त्रंबक खानोलकर

    आरती प्रभू

    आत्माराम रावजी देशपांडे

    अनिल

    विष्णुशास्त्री चिपळूणकर

    मराठी भाषेचे शिवाजी

    विनायक जनार्दन करंदीकर

    विनायक

    काशिनाथ हरी मोदक

    माधवानुज

    प्रल्हाद केशव अत्रे

    केशवकुमार

    दादोबा पांडुरंग तर्खडकर

    मराठी भाषेचे पाणिनी

    शाहीर राम जोशी

    शाहिरांचा शाहीर

    ग. त्र.माडखोलकर

    राजकीय कादंबरीकार

    न. वा. केळकर

    मुलाफुलाचे कवी

    ना. चि. केळकर

    साहित्यसम्राट

    यशवंत दिनकर पेंढारकर

    महाराष्ट्र कवी

    ना.धो.महानोर

    रानकवी

    संत सोयराबाई

    पहिली दलित संत कवयित्री

    बा.सी. मर्ढेकर

    मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी

    कृष्ण शास्त्री चिपळूणकर

    मराठीचे जॉन्सन

    वसंत ना. मंगळवेढेकर

    राजा मंगळवेढेकर

    माणिक शंकर गोडघाटे

    ग्रेस

    नारायण वामन टिळक

    रेव्हरंड टिळक

    सेतू माधवराव पगडी

    कृष्णकुमार

    दासोपंत दिगंबर देशपांडे

    दासोपंत

    हरिहर गुरुनाथ कुलकर्णी

    कुंजविहारी

    रघुनाथ चंदावरकर

    रघुनाथ पंडित

    सौदागर नागनाथ गोरे

    छोटा गंधर्व

    दिनकर गंगाधर केळकर

    अज्ञातवासी

    माधव त्रंबक पटवर्धन

    माधव जुलियन

    शंकर काशिनाथ गर्गे

    दिवाकर

    गोपाल हरी देशमुख

    लोकहितवादी

    नारायण मुरलीधर गुप्ते

    बी

    दत्तात्रय कोंडो घाटे

    दत्त

    नारायण सूर्याजीपंत ठोसर

    रामदास

    मोरोपंत रामचंद्र पराडकर

    मोरोपंत

    यशवंत दिनकर पेंढारकर

    यशवंत

    आपणास उपयुक्त असणाऱ्या अजून टेस्ट सोडवा :

     

    मराठी साहित्यक आणि त्यांचे साहित्य :

    1)     ययाती : वि.स.खांडेकर

    2)     वळीव: शंकर पाटील

    3)     श्यामची आई : साने गुरुजी

    4)     अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम : शंकरराव खरात

    5)     यक्षप्रश्न : शिवाजीराव भोसले

    6)     बुद्धिमापन कसोटी : वा.ना.दांडेकर

    7)     बनगरवाडी : व्यंकटेश माडगुळकर

    8)     तीन मुले : साने गुरुजी

    9)     शेकोटी : डॉ. यशवंत पाटणे

    10) मृत्युंजय : शिवाजी सावंत

    11) फकीरा : अण्णाभाऊ साठे

    12) राजा शिवछत्रपती : बाबासाहेब पुरंदरे

    13) पांगिरा : विश्वास महिपती पाटील

    14) तो मी नव्हेच : प्र. के. अत्रे

    15) गोलपिठा : नामदेव ढसाळ

    16) कोसला : भालचंद्र नेमाडे

    17) एकेक पान गळावया : गौरी देशपांडे

    18) गावपांढर : आप्पासाहेब यशवंत खोत

    19) कल्पनेच्या तीरावर : वि.वा.शिरवाडकर

    20) गावचा टीनोपाल गुरुजी : शंकरराव रामराव

    21) स्वप्नपंख : राजेंद्र मलोसे

    22) योगासने : व. ग. देवकुळे

    23) १८५७ ची संग्राम गाथा : वि. स. वाळिंबे

    24) बटाट्याची चाळ : पु. ल. देशपांडे

    25) माझे विदयापीठ : नारायण सुर्वे

    26) रणांगण : विश्राम बेडेकर

    27) गाथा आरोग्याची : डॉ. विवेक शास्त्री

    28) नटसम्राट : वि. वा. शिरवाडकर

    29) हिरवा चाफा : वि. स. खांडेकर

    30) माणदेशी माणस : व्यंकटेश माडगुळकर

    31) उचल्या : लक्ष्मण गायकवाड

    32) डॉ. बाबासाहेब आंबेडकर : शंकरराव खरात

    33) झोंबी : आनंद यादव

    34) एक माणूस एक दिवस : ह. मो. मराठे

    35) इल्लम : शंकर पाटील 

    36) क्रोंचवध : वि. स. खांडेकर

    37) अमृतवेल : वि. स. खांडेकर

    38) झाडाझडती : विश्वास पाटील

    39) ऊन : शंकर पाटील

    40) नाझी भस्मासुराचा उदयास्त : वि. ग. कानिटकर

    41) बाबा आमटे : ग. भा. बापट

    42) वपुर्झा : व. पु. काळे

    43) स्वामी : रणजीत देसाई

    44) पानिपत : विस्वास पाटील

    45) स्वभाव, विभाव : आनंद नाडकर्णी

    46) छावा : शिवाजी सावंत

    47) जागर खंड भाग १ व २ : प्रा. शिवाजीराव भोसले

    48) आमचा बाप अन आम्ही : डॉ. नरेंद्र जाधव

    49) आगे आणि नाही : वि. वा. शिरवाडकर

    50) ग्रामगीता : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

    51) मराठी विश्वकोश १,,,१४,१५,१६ : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

    52) संभाजी : विश्वास पाटील

    53) क्षेत्रफळ आणि घनफळ : डॉ. रवींद्र बापट

    54) महानायक : विश्वास पाटील

    55) श्रीमान योगी : रणजीत देसाई

    56) ऋणसंख्या : नागेश शंकर माने

    57) यशाची गुरुकिल्ली : श्याम मराठे

    58) आई समजून घेताना : उत्तम कांबळे

    59) मी वनवासी : सिंधुताई सपकाळ

    60) प्रॉब्लेम ऑफ रुपी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    61) तराळ अंतराळ : शंकरराव खरात

    62) खळाळ : आनंद यादव

    63) वनवास : प्रकाश नारायण संत

    64) उपरा : लक्ष्मण माने

    65) बळीवंश : डॉ. आ. ह. साळुंखे

    66) सांकृतिक संघर्ष : शरणकुमार लिंबाळे

    67) अग्निपंख : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम   

    68) दुनियादारी : सुहास शिरवळकर

    69) वामन परत न आला : जयंत नारळीकर

    70) शिकस्त : रा. स. इनामदार

    71) हृदयाची हाक : वि. स. खांडेकर

    72) जिजाऊ साहेब : मदन पाटील

    73) अद्वितीय संभाजी : अनंत दारवटकर

    74) बुधभूषण : छत्रपती संभाजी महाराज

    75) पार्टनर : व. पु. काळे

    76) तुकाराम दर्शन : सदानंद मोरे

    77) झुळूक : मंगला गोडबोले

    78) लोकायत : स. रा. गाडगीळ

    79) पाचोळा : रा. र. बोराडे

    80) शिवाजी कोण होता ? : कॉ. गोविंद पानसरे

    81) पण लक्षात कोण घेतो : हरी नारायण आपटे

    82) दगलबाज शिवाजी : प्रबोधनकार

    83) विचार सत्ता : डॉ. यशवंत मनोहर

    84) अयोध्या : माधव भंडारी

     purchase beby radha dress 

     


    Post a Comment

    0 Comments