Total Pageviews

marathi vyakaran- मराठी व्याकरण - भाषा

 

भाषा

आपली मराठी भाषा हि भरतील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे . भारतातील तिसऱ्या क्रमांकावर आणि जगात दहाव्या क्रमांकावर आहे .आपल्या भाषेचे गुणगान संत महंतांनी गायले आहे . स्पर्धा परीक्षा यांमध्ये भाषेवर हमखास प्रश्न असतोच. आज आपण marathi vyakaran- मराठी व्याकरण - भाषा   हे प्रकरण अभ्यासणार आहोत .

     

    marathi vyakaran- मराठी व्याकरण - भाषा
    marathi vyakaran- मराठी व्याकरण - भाषा 

    भाषा –

    Ø  विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा

    Ø  बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा

    Ø  काही व्याकरणकरांनी भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आले . कारण भाषा हि प्रवाही आहे. प्रदेशानुसार , काळानुसार भाषा बदलत जाते .

    Ø  भाषेची कौशल्ये : एकूण पाच

    Ø  बोलणे , ऐकणे, वाचणे,लिहिणे  आणि आकलन

    Ø  भाषा मूळ धातू – भाष्


    Read More : काही महत्वाचे वाचा 

    भाषेचे प्रकार : मुख्य प्रकार दोन


    १)      नैसर्गिक भाषा / स्वाभाविक  २) कृत्रिम / सांकेतिक

    १) नैसर्गिक भाषा

    Ø  हावाभावांच्या आणि खाना खुणांच्या, संकेतांच्या भाषेला नैसर्गिक भाषा

    Ø  हे हावभाव मानव /प्राण्याला जन्मजात अवगत असतात .

    Ø  पुरावा नसतो.

    Ø  उदा .प्राण्याची भाषा, हावभाव, बोलणे इत्यादी

    २) कृत्रिम / सांकेतिक :  

    Ø  जेव्हा एखादे संकेत ठरवून केलेले हावभाव किवा ध्वनीची चिन्हे यांना साकेतिक भाषा म्हणतात.

    Ø  पुरावा असतो.

    Ø  उदा . लिखाण, टंकलेखन, चिन्हे, ध्वनीमुद्रण

    भाषेचे इतर प्रकार ( स्वरूप )

    Ø  बोली भाषा –दैनंदिन जीवनात संपर्कासाठी ,ठराविक प्रदेशातील लोकांच्या तोंडी असलेली भाषा

    Ø  मातृभाषा – आईची भाषा , घरात बोलली जाणारी भाषा

    Ø  प्रमाणभाषा – शासकीय पत्र व्यवहार, शास्त्रीय दृष्ट्या वापरली जाणारी प्रमाण भाषा

    मराठी भाषेचे उगम स्थान – संस्कृत व प्राकृत

    Ø  प्राकृत भाषा -  मूळ महाराष्ट्रीय लोकांची भाषा + अपभ्रंश भाषा

    Ø  अपभ्रंश – संस्कृत मधील ध्वनी किंवा इतर भाषेतील ध्वनी मराठीत येताना त्याच्याध्वनिमध्ये बदल होतो  त्याला अपभ्रंश म्हणतात.  


    काही  महत्वाचे  - तुम्हला माहित  हवेच - नक्की वाचा-लिहा-पाठांतर करा

     

    मराठी भाषेची लिपी :

    Ø  लिपी – लिपी म्हणजे आपण ज्या खुणांनी लेखन करतो, त्याला लिपी असे म्हणतात.

    Ø  लिपी मूळ धातू – लिप्

    Ø  मराठी भाषेची लिपी  - देवनागरी

    Ø  या लिपीला बाळबोध लिपी असेही संबोधले जाते .


    तलाठी  भरती बुक लिस्ट पहा : 

    https://examworld24.blogspot.com/2023/06/Talathi%20Bharati%20best%20books%20list%20%20%20%20%20%20%20.html

    तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी  examworld24 ला follow करा 

    महत्वाच्या लिपी –

    v  देवनागरी

    Ø  या लिपीला आर्यांची लिपी / बाळबोध लिपी असेही ही म्हणतात .

    Ø  आर्य लोकांची भाषा

    Ø  लहान मुलांनाही लिपी समजते म्हणून तिला बाळबोध लिपी असे म्हणतात.

    Ø  देवनागरी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते.

    Ø  प्रत्येक  अक्षरावर शिरोरेषा असते.

    Ø  अक्षरे उभ्या, आडव्या, तिरप्या, अर्धगोल,गोलाकर रेषांनी बनलेली असते.

    Ø  देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा – मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इ.

     

    v  मोडी लिपी

    Ø  देवनागरी लिपी मुरड घालून लिहीलीली लिपी म्हणजे मोडी लिपी होय.

    Ø  दोन शब्दांमध्ये जागा न सोडता शब्द लागोपाठ लिहिले जातात.

    Ø  मोडी लिपीला धाव लिपी असे ही म्हणतात.

     

    v  ब्राम्ही लिपी :

    Ø  भारतातील प्राचीन लिपी .

    Ø  सर्व लिपींची जननी मानली जाते.

     

    v  खरोष्ठी लिपी –

    Ø  या लिपीला गांधारी लिपी असेही म्हणतात.

    Ø  तिसऱ्या शकतात जास्त वापर .

    Ø  कुषाण काळात भारतात ह्या लिपीचा वापर .

    भारतीय भाषा

    Ø  भारतीय भाषा प्रामुख्याने दोन गटात विभागल्या गेल्या आहेत.

    १)      इंडो आर्य भाषा      २) द्रविडीय भाषा

    Ø  भारतीय घटनेनुसार सध्या २२ प्रादेशिक भाषांना राजकीय व राजभाषा यांचा दर्जा दिला आहे.

    Ø  आसामी,बंगाली,बोडो,  डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाली, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलगू, उर्दू

    Ø  द्रविडीय गटातील भाषा - कन्नड,तमिळ, तेलगू, मल्याळम

    Ø  भारतीय घटनेत कलम ३४३ नुसार हिंदी तसेच इंग्रजी हा संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत.

    Ø  हिंदी आणि तमिळ ह्या जुन्या भाषा मानल्या जातात.

     पोलीस भरती /तलाठी भरती टेस्ट सोडवा : तलाठी स्पर्धा परीक्षांसाठी - टेस्ट द्या

    अभिजात भाषा :

    Ø  केंद्र सरकारकडून काही भाषांच्या संवर्धनासाठी मदत केली जाते. अशा भाषांना अभिजात भाषा म्हणतात.

    Ø  कोणती भाषा अभिजात भाषा ठरवावी याचे काही निकष आहे. जि भाषा हे निकष पूर्ण करते त्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो.

    अभिजात भाषेसंदर्भात काही निकष :

    Ø  भाषा प्राचीन काळी मान्यता प्राप्त असावी. म्हणजे भाषेची प्राचीनता

    Ø  भाषेची सलगता

    Ø  वाङ्मयीन परंपरा

    Ø  आधुनिक काळात हि तिचे अस्तित्व टिकून आहे.

    Ø  प्राचीन भाषा व आधुनिक रूप यांच्यातील त्यांचे नाते.

    Ø  आतापर्यंत एकूण ६ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

    ü  संस्कृत

    ü  तमिळ

    ü  कन्नड

    ü  तेलगू

    ü  मल्याळम

    ü  उडिया

    मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. कार्यवाही सुरु आहे.

    या संदर्भात राज्य सरकारने अभिजात भाषा मराठी समिती नेमली होती

    अध्यक्ष ; प्रा. रंगनाथ पठारे ( अध्यक्ष )

    स्थापना : 10 जानेवारी 2012

    अंतिम अहवाल ; मे 2013



    बुद्धिमत्ता चाचणी 


    मराठीतील काही शिलालेख

    Ø  शिलाहार केशिदेव अक्षी -         अक्षी, कुलाबा जि. रायगड (934)

    Ø  कुडळ शिलालेख  -             कुडळ,जि. सोलापूर (940)

    मराठी व्याकरण :

    Ø  भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात.

    Ø  भाषा शुद्ध करणारे शास्त्र

    Ø  मराठी व्याकरणावर संस्कृत व इंग्रजी या दोन भाषांचा प्रभाव दिसतो.

    Ø  भाषा ही प्रवाही असते . काळानुसार तिच्यामध्ये बदल होत असतो . या कारणास्तव व्याकरणात ही बदल होत असतो. काही व्याकरणकरांमध्ये भिन्नता आढळते.

     

     Download app Now - Click Here 


     

    व्याकरणातील काही पुस्तके :

    Ø  विल्यम कॅरी – ड ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज ( इंगजी )  1805

    Ø  गंगाधर शास्त्री फडके – महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836

    Ø  दादोबा पांडुरंग तर्खडकर - महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836

    Ø  मोरो केशव दामले – शास्त्रीय मराठी व्याकरण 1911

    Ø  म.पा. सबनीस – आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण

    Ø  मो रा वाळंबे – सुगम मराठी व्याकरण

     

    • मराठी भाषेचे पाणिनी – दादोबा पांडुरंग तर्खडकर
    • मराठी भाषेचे शिवाजी – विष्णुशास्त्री चिपळूणकर
    • मराठी भाषेचे जॉन्सन – कृष्णाशात्री चिपळूणकर


    पोलीस भरती साठी काही महत्वाची पुस्तके 

    (नावावर क्लिक करून पुस्तक online order करा .)

    Post a Comment

    0 Comments