Maths formulas गणितातील महत्वाची सूत्रे
गणितातील
महत्वाची सूत्रे भाग 1
भूमिती सूत्र
गणिताच्या अरण्यातून
जाताना सूत्रांची कुऱ्हाड हाती घ्यावी लागते .
- Ø गणितातील प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला सूत्रांची मदत घ्यावी लागते
- Ø जर आपण स्पर्धा परीक्षा , पोलीस भरती किंवा अन्य भरती तयारी करत असाल तर तुम्हाला सूत्र हि पाठ हवीच
- Ø आपण गणितातील अतिशय परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची सूत्रे पाहणार आहोत.
सूत्रे
आयत :
- Ø आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)
- Ø आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी
चौरस :
- Ø चौरसाचे क्षेत्रफळ = ( बाजू )2
- Ø चौरसाची परिमिती = 4 × बाजू
- Ø चौरसाचे क्षेत्रफळ = ( कर्ण )2 / 2
समांतरभूज
चौकोन :
- Ø समांतरभूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया × उंची
समभूज चौकोन
- Ø समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ = कर्णांच्या लांबीचा गुणाकार / 2
Ø
समलंब चौकोन :
- Ø समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = (समांतर बाजूंची बेरीज ) × उंची / 2
त्रिकोण :
- Ø त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया × उंची / 2
Ø समभूज
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = (√3 / 4) × बाजू2
Ø हीरोचे सूत्र
त्रिकोणाच्या
फक्त सर्व बाजू दिल्या असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे
1 . अर्धपरीमिती(s)
अर्धपरीमिती (s)= a+b+c / 2
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √[s(s – a)(s – b)(s – c)]
वर्तुळ :
Ø वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2
Ø वर्तुळाचा परीघ = 2πr किंवा
πd
Ø अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 / 2
Ø वर्तुळाचा व्यास = 2×
त्रिज्या
Ø वर्तुळाची त्रिज्या = व्यास/2
मुंबईतील नामांकित पोलीस अकॅडमी - click here
आयत –
ü ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान व चारही कोन ९० अंशाचे असतात, अशा चौकोनाला आयत म्हणतात.
ü आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणून प्रत्येक आयत हा समांतरभुज
चौकोनसुद्धा असतो
Ø आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)
Ø आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी
आयाताचे गुणधर्म :
Ø
१-आयताच्या
संमुख बाजू एकरूप असतात.
Ø
२-आयताचे
कर्ण एकरूप असतात .
Ø
३-आयताचे
कर्ण परस्परांना दुभागतात.
ü आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ
तेवढेच राहते.
ü आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट
होते.
Maths formulas गणितातील महत्वाची सूत्रे
चौरस –
ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप व प्रत्येक कोण काटकोन असतो
,त्या चौकानासचौरस असे
म्हणतात.
चौरसाचे
गुणधर्म :-
Ø चौरसाचे कर्ण एकरूप असतात .
Ø चौरसाचे कर्ण परस्परांना
दुभागतात .
Ø चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक
असतात .
चौरसाची
परिमिती= 4×बाजूची लांबी
चौरसाचे
क्षेत्रफळ=(बाजू)2
चौरसाचे
क्षेत्रफळ = (कर्ण)2/2
चौरसाचा कर्ण =
ü
चौरसाची
बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
ü
दोन
चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या
पटीत असते.
समभुज चौकोण –
ज्या चौकोनाच्या सर्व
बाजू एकरूप असतात ,त्या चौकोनास समभूज चौकोन
असे म्हणतात .
समभूज
चौकोनाचे गुणधर्म :-
Ø
१-समभूज
चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात .
Ø
२-समभूज
चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात .
Ø
३-समभूज
चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात .
समभुज
चौकोनाचे क्षेत्रफळ = कर्णाच्या लांबीचा
गुणाकार/2
समलंब चौकोण –
समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ
= समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2
समलंब चौकोनाचे लंबांतर =
क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज
समलंब चौकोनाच्या समांतर
बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर
त्रिकोण –
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2
·
काटकोन
त्रिकोणाचे क्षेत्रफळ =
काटकोन करणार्या बाजूंचा
गुणाकार/2
0 Comments