How to Focus on Study || अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी
आपल्या आयुष्यात एकाग्रतेला खूप महत्त्व आहे. एकाग्रतेने अवघड गोष्टी सोप्या होतात .आपल्या एकाग्रतेचे आणि अभ्यासाचं काय नक्की नात आहे आणि ती एकाग्रता कशी वाढवू शकतो याचा अभ्यास आपण करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय किंवा शालेय जीवनाचा अभ्यास करत आहात, तर त्यामध्ये तुमच्या गुणांमध्ये वाढ होणे खूप गरजेचे आहे. तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय पार करायचं असेल तर मात्र आपल्यासमोर असलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे एवढे माफक उद्दिष्ट आपले असते. कुठलेही काम असो ते जर काम मनाने आणि एकाग्रतेने केलास आपण त्याच्यात नक्कीच सफल होतो हे आजवर प्रयोगांती सिद्ध झालेले आहे. हे तुम्हा - आम्हाला जरी माहीत असलं की एकाग्रतेने केलेला अभ्यास हा खूप परिणाम कारक असतो , तरी मात्र आपल्याला अभ्यासात अडचणी येतच असतात आणि आपलं मन काय अभ्यासात लागत नाही हे मात्र तितकेच खरे आहे. तर मग आज आपण पाहणार आहोत How to Focus on Study अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी .
![]() |
How to Focus on Study || अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी |
How to Focus on Study || अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी :
परीक्षा जवळ आली की
आपल्या डोक्यात विचारांची चक्र सुरू होतात. विचारांची धावती आगगाडी एका मागून मग
एक स्टेशन घेतच जाते. तुम्हाला खूप सारे प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर डोक्यात येत
असतात. माझं सिलेक्शन होईल की नाही, कशा
पद्धतीचा पेपर येईल, कट ऑफ किती लागेल इत्यादी .
● माझं मन अभ्यासात लागत नाही.
●10 पेक्षा जास्त वेळ मी अभ्यासात
कॉन्स्ट्रेट करू शकत नाही.
● मोबाईल घ्यावासा वाटतो.
● मोबाईल वर जर अभ्यास असेल तर
थोडा वेळाने मी रिल्स, स्टोरी, पोस्ट
बघण्यात वेळ जातो.
●काहीच साध्य होत नाही.
● tv ,गप्पा, घरामध्ये
खूप सदस्य असल्याने माझा अभ्यास होत नाही
![]() |
How to Focus on Study || अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी |
एकाग्रतेने अभ्यास केल्याचे फायदे
● थोडा वेळ जरी अभ्यास केला तरी तो
कायम(दिर्घकाळसाठी) लक्षात राहतो.
● गुणांमध्ये हमखास वाढ होते.
● अभ्यासाची भीती राहत नाही.
●चीड चीड होत नाही, म्हणून मन प्रसन्न राहते.
आत्मविश्वास वाढतो .
विद्यार्थांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत .
कुठे
ही वेळ घळवताना ,त्या वेळेतून आपल्याला फायदा
होणार की तोटा याचा एकदा विचार करावा.
उदा. Intaa
किंवा fb वर रिल्स बघून फायदा होणार आहे की
नुसताच वेळ फुकट जाणार आहे. त्याने तुमच्या आयुष्यात काही बदल होणार आहे का?
मित्रांशी
गप्पा मारणे,टीव्ही पाहणे,याच्याने
माझ्या जीवनात काही बदल होणार आहे का , काही शिकला मिळणार आहे का किंवा माझी ज्ञानात काही वाढ होणार आहे का ?
तुमचं ध्येय साध्य
झाल्यानंतर ह्या गोष्टी करू शकता. परंतु तुमचं ध्येय जोपर्यंत साध्य होत नाही तो
पर्यंत थांबू नका.
मन एकाग्र करणयासाठी काय करावे?
How to Focus on Study || अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी
१) योगा करणे(व्यायाम) :-
हा तसा जुना उपाय आहे.
व्यायाम करा , योगासने करा सर्वजण आपल्या सांगत असतात. परंतु आपण दुर्लक्ष करत
असतो. ह्या धावपळीच्या युगात आपल्याला वेळ कुठे आहे. सकाळी ग्राऊंड, कॉलेज, शाळा, क्लास सर्व .
व्यायामासाठी तुम्हाला एखादी जिम लावावीच पाहिजे अशी काही गरज नाही. तुम्ही सहज
सोपी योगासने घरी करू शकता. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर सकाळी उठल्यानंतर
तुमच्याकडे दहा ते पंधरा मिनिटे असतील तर तुम्ही प्राणायाम करू शकता. सूर्यनमस्कार
करू शकतात यांनी तुमचे शरीर शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते आणि मन प्रसन्न राहते.
काही दिवस तुम्हाला हे करण्याचा कंटाळा येऊ शकतो. परंतु आठवडाभर सातत्य ठेवल्याने याचा चांगला परिणाम तुम्हाला
दिसेल. याने तुमच शरीर आणि मन हे दोन्हीही प्रफुल्लीत राहतात . त्यामुळे
तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढते.
![]() |
How to Focus on Study || अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी |
२) कॉन्स्ट्रेट करणारे game खेळावे:
आपण अभ्यासाबद्दल बोलतोय आणि इथे मध्येच गेम्स काय? हा तर गेम ही आपली एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतात. परंतु कोणते गेम खेळावेत? जेणेकरून आपली एकाग्रता वाढेल.
- 1) Sudoku,
- 2) चेस,
- 3) शब्दकोडी
(याचा उपयोग तुमच्या बुद्धिमता विषयात होऊ
शकतो)
हे
खेळ काही तुम्हाला पूर्ण दिवसभर खेळत बसायचे नाहीयेत. तर एखादा आठवड्यातून एकदा
किंवा दोनदा जसा वेळ मिळेल तसा.
अभ्यास
करण्याच्या पूर्वी नेहमी तुम्ही उलटे 100 पासून एक
पर्यंत अंक मोजू शकता मध्ये अडथळा न आणता हे नेहमी करत चला जेणेकरून तुमची
एकाग्रता वाढीस लागेल .
![]() |
How to Focus on Study || अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी |
![]() |
Download app Now - Click Here |
३)पुरेशी झोप:
झोपेचा आणि अभ्यासाचा
काय संबंध किंवा एकाग्रतेची तरी काय संबंध ? आपल्याला हे जाणवत नाही की आपल्या झोपेचा आपल्या
शरीरावर , आपल्या मनावर फार परिणाम होत असतो. जसं अविरत आपण बाहेर काम करत असतो
तसं शरीर सुद्धा 24 तास अविरतपणे काम करत असते.
त्यालाही विश्रांतीची गरज असते आणि म्हणून झोप ही आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी
गरजेची आहे. झोप पुरेशी झाली नाही तर
तुमची चिडचिड होते. हे तुम्ही कधी अनुभवलं असेल. शक्यतो दुपारची झोप घेणे टाळत जा आणि रात्रीची
पुरेशी सात ते आठ तास झोप घ्या. कितीही काम असले तरी सात ते आठ तास ही पुरेशी झोप
घ्या. झोप घेण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल बाजूला ठेवा आणि टीव्ही ही बंद करा.
![]() |
How to Focus on Study || अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी |
हे उपाय वाचणे, ऐकणे,
पाहणे सोप आहे, परंतु प्रत्यक्षात अमलात आणणे थोडं कठीण जातं. तुम्हाला जर तुमचं ध्येय साध्य
करायचं असेल तर या गोष्टी टाळावाच लागणार, तुम्हाला स्वतःला शिस्तही लावूनच घ्यावी
लागणार, कारण की शिस्त लावल्याशिवाय आपल्या सवयींवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे हे
मनाशी पक्क ठरवा.
काही महत्वाचे - तुम्हला माहित हवेच - नक्की वाचा-लिहा-पाठांतर करा
४) मेडिटेशन करा:
रात्री
झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा ध्यान लावून बसू शकता किंवा सकाळी उठल्यानंतर.
५) मोबाईल ,सोशल मिडिया यांचा मर्यादित वापर :
आपण
एखादी post किंवा रील्स फेसबुक ,insta वर पाहतो. जर ती निगेटिव्ह असेल तिचा परिणाम
आपल्या मेंदूवर दिवसभर राहतो .त्यामुळे
त्या संबंधित विचार आपल्या मनात ,मेंदूत सतत येत राहत्तात . त्याने आपल्या
एकाग्रतेवर परिणाम करते . पर्यायाने अभ्यासावर परिणाम होतो . त्यामुळे अभ्यासासाठी मोबाईलचा मर्यादित वापर
करावा.
६) इतर उपाय
I)
पुरेसा आणि पौष्टिक आहार वेळेवर घेणे
II) एकाच वेळी अनेक कामे टाळा. एकाचा वेळी
एकाच कामावर लक्ष केंद्रित करा .
III) अभ्यास करताना एकाच विषयाचा विचार करावा
.
IV) तुमच्या वेळेचे नियोजन करा
वरील सर्व उपाय एकाच वेळी तुम्हाला शक्य नाही.
मग तुम्ही एक एक उपाय अमलात आणू शकता .
याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर नक्की होईल आणि तुमच्या
गुणांनमध्ये वाढ होऊन तुमची post लवकर निघेल यात शंका नाही .
कोणत्याही गोष्टीला सुरुवात करावीच लागते .
पोलीस भरती साठी काही महत्वाची पुस्तके
0 Comments