मुख्यमंत्री कसा निवडला जातो || उपमुख्यमंत्री हे पद असंवैधानिक ?
मुख्यमंत्री होण्याची पात्रता
- भारताचा नागरिक.
- राज्य विधिमंडळाचा सदस्य असावा
- 25 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे
विधीमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती म्हणजेच आमदार नसलेले व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते का ?
या प्रश्नाचे उत्तर आहे होविधानमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून गणली जाऊ शकते जर ते त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत राज्य विधानसभेवर किंवा विधानपरिषदेवर निवडून आले पाहिजे. तसे न झाल्यास त्यांचे मुख्यमंत्रीपद संपुष्टात येते .
उदा. 2019 च्या विधानसभेमध्ये ज्यावेळी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी महाविकास आघाडी स्थापन करून विधानसभेचे सदस्य नसलेले (आमदार नसलेले) श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यासाठी ते विधानपरिषदेचे सदस्य झाले .
मुख्यमंत्र्यांची निवड कशी केली जाते?
राज्य
घटनेत मुख्यमंत्री निवडीबाबत स्पष्ट तरतूद नाही .कलम १६४ नुसार राज्यपाल
मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील असे म्हटले आहे. राज्याच्या विधानसभा
निवडणुकीनंतर ज्या पक्षाला बहुमत मिळाले असेल त्या पक्षाला राज्याचे राज्यपाल
सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतात. जर बहुमत नसल्यास राजकीय पक्ष युती किंवा आघाडी
करून स्वतःकडे बहुमत आहे हे सिद्ध करतात आणि राज्यपालांकडे दावा सरकार स्थापन
करण्याचा दावा करतात. मुख्यमंत्र्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागतं. राज्यपाल
मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि शपथ घेतात. थोडक्यात विधानसभेवर निवडून आलेले
सदस्य आपल्यापैकी एकाला मुख्यमंत्री म्हणून निवड करतात .
उपमुख्यमंत्री पद संवैधानिक ? की असंवैधानिक ?
घटनेत किंवा कायद्यात
ह्या पदाचा उल्लेख नाही . मात्र विविध राज्यांनी उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली
आहे. उपमुख्यमंत्री ह्या पदाचा वापर अनेकदा पक्ष किंवा युतीमधील गटबाजी शांत
करण्यासाठी केला जातो. विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी याचा वापर करतात. मुख्यमंत्र्यांच्या
अनुपस्थितीत, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या
बैठकीचे अध्यक्षस्थान करू शकतात आणि विधानसभेतील बहुमताचे नेतृत्व करू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या
अनुषंगाने विविध उपमुख्यमंत्र्यांनीही गोपनीयतेची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री
पदाला मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाच स्थान समजलं जातं. पहिल्या स्थानी
मुख्यमंत्रीच असतो.
एका पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असणारी राज्ये
- आंध्रप्रदेश
– ५ उपमुख्यमंत्री
- महराष्ट्र – ३ उपमुख्यमंत्री
- उत्तरप्रदेश
– २ उपमुख्यमंत्री
- मेघालय – २ उपमुख्यमंत्री
- नागालँड -२ उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रात
सर्वात जास्त उपमुख्यमंत्री पदाची शपत घेणारे -अजित पवार – राष्ट्रवादी कॉंग्रेस
मुख्यमंत्री मानधन
देशात सर्वाधिक
मानधन घेणाऱ्यांत तेलंगणाच्या मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर आहेत. तेलंगणाच्या
मुख्यमंत्र्यांना मासिक ४ लाख १० हजार रुपये मानधन म्हणून मिळतात.
सर्वात जास्त
मानधन घेणारे मुख्यमंत्री
- तेलंगणा ४,१०,०००
रुपये
- दिल्ली ३,९०,०००
रुपये
- उत्तर
प्रदेश ३,६५,०००
रुपये
- महाराष्ट्र
३,४०,०००
रुपये
- आंध्र
प्रदेश ३,३५,०००
रुपये
- गुजरात ३,२१,०००
रुपये
जास्त काळ पदावर राहणारे महराष्ट्रातील मुख्यमंत्री
अनु .क्र |
नाव |
पक्ष |
|
|||
एकूण
कालावधी |
किती वेळा
मुख्यमंत्री |
|||||
१ |
वसंतराव नाईक |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
११ वर्षे, ७८ दिवस |
०३ |
||
२ |
विलासराव
देशमुख |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
७ वर्षे, १२९ दिवस |
०२ |
|
|
३ |
शरद पवार |
६ वर्षे, २२१ दिवस |
०४ |
|
||
४ |
यशवंतराव चव्हाण |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
६ वर्षे, १९ दिवस |
०१ |
|
|
५ |
देवेंद्र
फडणवीस |
भाजप |
५ वर्षे, १७ दिवस |
०२ |
|
|
६ |
शंकरराव
चव्हाण |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
४ वर्षे, १९१ दिवस |
०२ |
|
|
७ |
मनोहर
जोशी |
शिवसेना |
३ वर्षे, ३२४ दिवस |
०१ |
|
|
८ |
पृथ्वीराज
चव्हाण |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
३ वर्षे, ३२१ दिवस |
०१ |
|
|
९ |
वसंतदादा
पाटील |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
३ वर्षे, १८३ दिवस |
०३ |
|
|
१० |
उद्धव
ठाकरे |
शिवसेना |
२ वर्षे, २१४ दिवस |
०१ |
|
|
११ |
अशोक
चव्हाण |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
१ वर्ष, ३३८ दिवस |
०२ |
|
|
१२ |
सुशीलकुमार
शिंदे |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
१ वर्ष, २८८ दिवस |
०१ |
|
|
१३ |
सुधाकरराव
नाईक |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
१ वर्ष, २५४ दिवस |
०१ |
|
|
१४ |
अब्दुल
रहमान अंतुले |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
१ वर्ष, २२६ दिवस |
०१ |
|
|
१५ |
बाळासाहेब
भोसले |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
१ वर्ष, १२ दिवस |
०१ |
|
|
१६ |
मारोतराव कन्नमवार |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
१ वर्ष, ४ दिवस |
०१ |
|
|
१७ |
शिवाजीराव
निलंगेकर |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
० वर्षे,
२८२ दिवस |
०१ |
|
|
१८ |
नारायण
राणे |
शिवसेना |
० वर्षे,
२५९ दिवस |
०१ |
|
|
१९ |
एकनाथ
शिंदे |
बाळासाहेबांची
शिवसेना |
१ वर्ष,
६ दिवस |
०१* |
|
|
२० |
बाळासाहेब सावंत |
भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस |
० वर्षे,
१० दिवस |
०१ |
|
0 Comments